Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी वापरायचा होता 'S#@#' हा शब्द, पण राहुल द्रविडने स्वतःला आवरले, Video 

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने चौफैर फटकेबाजी केली. रवींद्र जडेजाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप न खेळण्याच्या, चर्चांवरही त्याने मत व्यक्त केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 02:48 PM2022-09-04T14:48:55+5:302022-09-04T14:49:13+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak  Highlight : 'It's 4-letter word but can't use it here', Rahul Dravid's response to India-Pakistan bowling comparison query | Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी वापरायचा होता 'S#@#' हा शब्द, पण राहुल द्रविडने स्वतःला आवरले, Video 

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानच्या गोलंदाजांसाठी वापरायचा होता 'S#@#' हा शब्द, पण राहुल द्रविडने स्वतःला आवरले, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. आता सुपर ४ मध्ये India vs Pakistan पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत. पण, दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घेतली आहे, जलदगती गोलंदाज आवेश खान हाही आजारी असल्याने आज खेळण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानच्या शाहनवाज दहानीने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ( Rahul Dravid) माहौल बनवला... 

आवेश खान आजारी... 
आवेश खान ( Avesh Khan) याला ताप आल्याचे द्रविडने शनिवारी सांगितले. तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. पण  त्यानंतरच्या सामन्यासाठी तो फिट ठरेल अशी आशा त्याने व्यक्त केली.  आवेशने आज सराव सत्रातही सहभाग घेतला नाही. त्याने दोन सामन्यांत ७२ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. हाँगकाँगच्या फलंदाजांनी त्याच्या ४ षटकांत ५३ धावा कुटल्या होत्या.  द्रविडने यावेळी विराट कोहलीच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, विश्रांतीनंतर ताजातवाना होऊन परतलेला विराट पाहून आनंद झाला. त्याच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. त्याने कारकिर्दीत एवढे विक्रम केलेत की त्याच्या लहान खेळीवर लोकं समाधानी होत नाही. पण, तिही संघासाठी महत्त्वाचीच असते.  

राहुल द्रविडने भारत व पाकिस्तान यांच्या गोलंदाजीबाबत म्हटले की,पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती आणि त्यांचा गोलंदाजी यूनिट चांगला आहे. पण आम्हीही त्यांना १४६ धावांत रोखून चांगली गोलंदाजी केली. ते १४५ च्या वेगाने चेंडू टाकत आहेत, हे आकडेवारीतून दिसतंय. पण,  सामन्याअंती गोलंदाजीचे आकडे महत्त्वाचे असतात.   

राहुल द्रविडला म्हणायचं होतं सेक्सी... पण,
द्रविड पुढे म्हणाला,''मला एका शब्दाचा वापर करायचा आहे, परंतु मी तो शब्द उच्चारू शकत नाही. माझ्या डोक्यात तो शब्द आहे, मुखातून तो निघणारच होता. पण, मी त्याचा उपयोग करू इच्छित नाही. मला जो शब्द म्हणायचा आहे तो चार अक्षरी आहे आणि तो S वरून सुरू होतो. आम्ही भलेही ग्लॅमरस दिसत नसलो, तरी आमच्याकडे निकाल देणारे खेळाडू आहेत.'' राहुल द्रविडला पाकिस्तानी गोलंदाजांसाठी Sexy हा शब्द वापरायचा होता, परंतु त्याने स्वतःला आवरले अन् पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला...  

पाहा व्हिडीओ...  



 

Web Title: T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak  Highlight : 'It's 4-letter word but can't use it here', Rahul Dravid's response to India-Pakistan bowling comparison query

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.