Asia Cup 2022 Ind vs Pak: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; रिषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 07:12 PM2022-08-28T19:12:13+5:302022-08-28T19:12:20+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight india won the toss and chose to bowl first know here playing XI | Asia Cup 2022 Ind vs Pak: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; रिषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI

Asia Cup 2022 Ind vs Pak: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; रिषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. दोन्हीही संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत, त्यामुळे दोन्हीही संघातील प्लेइंग इलेव्हनकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. दोन्हीही संघातील प्लेइंग इलेव्हन समोर आली असून नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने आला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दरम्यान, हे दोन्हीही कट्टर प्रतिस्पर्धी शेवटच्या वेळी मागील वर्षी टी-२० विश्वचषकात भिडले होते. तेव्हा पाकिस्तानच्या संघाने १० गडी राखून भारताचा दारूण पराभव केला होता. कर्णधार बाबर आझण आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीने एकतर्फी सामना करून पाकिस्तानच्या झोळीत विजय टाकला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून भारतीय संघ पराभवाचा बदला घेणार का हे पाहण्याजोगे असेल. तसेच आजचा सामना जिंकून आशिया चषकेत विजयी सलामी देण्याकडे रोहित सेनेचे लक्ष असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली आज आपला १००वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये आपल्या सामन्यांचे शतक ठोकणारा विराट एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. 

नसीम शाहने केले पदार्पण 
पाकिस्तानकडून १० वर्षीय नसीम शाह याला आज टी-२० मध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. नसीमने १३ कसोटीत ३३ आणि ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १० बळी घेतले आहेत. भारताविरूद्ध टी-२० मध्ये पदार्पण करणारा तो चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सोहैल तन्वीर (२००७ विश्वचषक), (मोहम्मद इरफान २०१२) आणि (खुर्रम मनझूर २०१६ आशिया चषक) यांनी भारताविरूद्ध पदार्पण केले होते. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद,  खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.  

Web Title: T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight india won the toss and chose to bowl first know here playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.