Suryakumar Yadav's Mother Prays For Shreyas Iyer's Recovery : भारतीय एकदिवसीय संघाचा उप कर्णधार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने एक सर्वोत्तम झेल टिपत कॅरीला तंबूचा रस्ता दाखवला. पण हा कॅच घेतल्यावर अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. परिणामी त्याला थेट रुग्णालयात नेण्याची वेळ आली. श्रेयस अय्यरवर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान श्रेयस अय्यर लवकर बरा व्हावा, यासाठी सूर्याच्या आईनं देवासमोर साकडं घातल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्या दादाची बहिणीनं शेअर केला खास व्हिडिओ
सूर्यकुमार यादवची बहिण दिनाल यादव हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक खास स्टोरी शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची आई स्वप्ना यादव या छठपूजेदरम्यान श्रेयस अय्यर लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करताना दिसून येते. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याचे कळल्यापासून अस्वस्थ आहे. आपण सर्वांनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करूया, अशी विनंतीही त्या या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
गंभीर दुखापतीनंतर आली क्रिकेटरला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ
सिडनीच्या मैदानात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रेयस अय्यर याने ॲलेक्स कॅरीचा एक सर्वोत्तम झेल टिपला. पण यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली. पहिल्यांदा त्याच्या बरगडीला मार लागल्याचे वाटले. पण तपासणीनंतर प्लीहेमधून अंतर्गत रक्तस्राव होत असल्याचे समोर आले. सिडनीतील रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आता त्याची प्रकृती स्थिर असून क्रिकेटला ICU तून बाहेर काढल्याची माहितीही समोर आली आहे. तो लवकर बरा होऊन पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरावा, अशी प्रार्थना क्रिकेट चाहते करत आहेत.
अय्यरच्या दुखापतीसंदर्भात सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया
सूर्यकुमार यादवनंही श्रेयस अय्यर आता ठिक असल्याची माहिती दिली होती. पहिल्यांदा कॉल केला त्यावेळी त्याने फोन उचलला नव्हता. पण त्यानंतर आमचं मेसेजवर बोलणं झालं आहे. तो स्वत: मेसेज करतोय त्यामुळे त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवनं दिली होती.