AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम

Tim David Suryakumar Yadav Cricket Records: ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:24 IST2025-08-11T15:17:52+5:302025-08-11T15:24:33+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav world record of highest strike rate broken by batsmen who once played for Mumbai Indians tim david | AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम

AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Tim David Suryakumar Yadav Cricket Records: ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १७८ धावा केल्या. ७५ धावांत ६ बळी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावरून घसरली असे वाटत होते. पण टिम डेव्हिडने सामन्याचा रंगच बदलून टाकला. स्टार फलंदाज टिम डेव्हिडने ५२ चेंडूत ८३ धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेला १६१ धावाच करता आल्या. या डावात टिम डेव्हिडने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला.

टिम डेव्हिडने मोडला सूर्याचा विश्वविक्रम

टीमने ८३ धावांची खेळी केली. टिम डेव्हिडने त्याच्या डावात ५२ चेंडूंचा सामना केला. त्याने पहिल्यांदाच ५० पेक्षा जास्त चेंडू खेळले. यापूर्वी, त्याने २०२० मध्ये हाँगकाँगविरुद्ध टी२० डावात सर्वाधिक ४६ चेंडू खेळले होते. टिम डेव्हिड हा आता सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेला फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवचा टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्ट्राईक रेट १६७.०७ आहे. पण आता टिम डेव्हिडचा स्ट्राईक रेट १६७.३७ झाला आहे. त्याने आपल्या दमदार खेळीच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला.

टिम डेव्हिडचा आणखी एक विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ८ षटकार मारण्याचा नवा विक्रम टिम डेव्हिडने रचला. यापूर्वी हा विक्रम सहा षटकारांचा होता. २००९ मध्ये मेलबर्नमध्ये डेव्हिड वॉर्नरने ८९ धावा करताना सहा षटकार खेचले होते. २००९ मध्ये जोहान्सबर्गमध्ये ८८ धावांच्या खेळीदरम्यान डेव्हिड हसीनेही हा आकडा गाठला होता. तर २०२३ मध्ये मिशेल मार्शने डर्बनमध्ये ७९ धावांच्या खेळीत सहा षटकार मारले आणि दोन दिवसांनी ट्रेव्हिस हेडनेही डर्बनमध्ये ९१ धावा करताना सहा षटकार मारले होते.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवले

दक्षिण आफ्रिकेसमोर १७९ धावांचे लक्ष्य होते. पण, त्याचा पाठलाग करताना त्यांना २० षटकांत ९ गडी बाद १६१ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने १७ धावांनी सामना जिंकला आणि यासह ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टिम डेव्हिडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Web Title: Suryakumar Yadav world record of highest strike rate broken by batsmen who once played for Mumbai Indians tim david

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.