PCB File Complaint Against Suryakumar Yadav : आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने सलग पाच विजयासह फायनलचं तिकीट पक्के केले आहे. जेतेपदाच्या लढतीत पुन्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत पाहायला मिळणार का? ही गोष्ट चर्चेत असताना आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या विरोधात ICC कडे धाव घेत तक्रार केल्याची गोष्ट समोर येत आहे. पाकिस्तानकडून सूर्यकुमार यादवच्या विरोधात दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. नेमकं काय आहे प्रकऱण? पाकच्या तक्रारीमुळे सूर्यकुमार यादव फायनलला मुकणार का? काय सांगतो नियम जाणून घ्या सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय आहे नेमकं प्रकरण? पाकिस्तान संघाची काय आहे तक्रार?
आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सामना चांगलाच चर्चेचा विषय राहिलाय. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार अन् संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. सूर्यकुमार यादवच्या विरोधात ज्या दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत त्या या प्रकरणाशी संबंधित आहेत. भारत-पाक यांच्यातील सामन्यानंतर आणि पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधारानं केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे.
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
मॅच रेफरींनी भारतीय संघाला पाठवला ई मेल, सूर्यावरील आरोपाबद्दल स्पष्ट केली भूमिका
ICC नं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीनंतर मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांना अहवाल तयार करण्यास सांगितले होते. यासंदर्भात मॅच रेफरींनी अहवाल तयार केला असून त्यांनी भारतीय संघाला ई मेल पाठवला आहे. रिची रिचर्डसन यांनी पाठवलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की, मला आयसीसीने दोन अहवाल हाताळण्यासाठी नेमले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सूर्यकुमार यादव याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेल्या विधानाबाबत दोन तक्रारी नोंदवल्या होत्या. या प्रकरणात पुरावे तपासून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, सूर्यकुमार यादवच्या विधानामुळे खेळाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे तो या प्रकरणात दोषी ठरतो. भारतीय कर्णधाराने आरोप मान्य केले नाहीत तर यावर सुनावणी होईल. त्या सुनावणीत माझ्यासह सूर्यकुमार यादव आणि पीसीबीचा प्रतिनिधी सहभागी असेल, असा उल्लेखही या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाला होता सूर्यकुमार यादव?
भारत-पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला. सामना संपल्यावर हस्तांदोलनाचा मुद्दा गाजला. एवढेच नाही तर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन वेळी सूर्यकुमार यादवनं पहलगामचा उल्लेख करत हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित करतो, असे म्हटले होते. याशिवाय सरकार आणि बीसीसीआयच्या आदेशानुसार, पाकिस्तान खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नव्हते, असे वक्तव्यही सूर्यकुमार यादवनं केले होते.
काय कारवाई होणार? सूर्यकुमार यादव फायनलला मुकणार का?
मॅच रेफरींनी टीम इंडियाला पाठवलेल्या ई मेलमध्ये सूर्यकुमार यादव या प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात त्याच्यावर कारवाई होईल. पण या प्रकरणात त्याला फायनल मुकावी लागणार नाही. कारण हे प्रकरण लेवल १ मध्ये मोडते. आयसीसी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तो दोषी ठरल्यावर त्याच्यावर मॅच फी कपातीची कारवाई केली जाऊ शकते. एखादा खेळाडू आयसीसी आचारसंहितेच्या २,३, किंवा ४ स्तरावरील उल्लंघन करतो त्याच वेळी त्याच्यावर बंदीची कारवाई होते.
Web Summary : Pakistan filed a complaint with the ICC against Suryakumar Yadav for his post-match comments after the India-Pakistan match. While found guilty, Yadav will likely face a match fee deduction, not a ban, and can play the final.
Web Summary : पाकिस्तान ने भारत-पाकिस्तान मैच के बाद सूर्यकुमार यादव की टिप्पणियों के लिए आईसीसी में शिकायत दर्ज की। दोषी पाए जाने पर यादव पर मैच फीस का जुर्माना लगेगा, प्रतिबंध नहीं, और वे फाइनल खेल सकेंगे।