T20 World Cup 2026 स्पर्धेतील सलामीच्या लढतीत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघ अडचणीत असताना जबरदस्त खेळीसह टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात ठराविक अंतराने एका मागून एक विकेट पडत असताना सूर्या शेवटपर्यंत मैदानात थांबला. परस्थितीनुसार संयमी खळी करत अखेरच्या षटकात गियर बदलून तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत त्याने संघाच्या धावफलकावर १६१ धावा लावल्या. या सामन्यात त्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खास खेळीत अनेक विक्रम मोडीत काढले. यात पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्याची तुफान फलंदाजी! अमेरिकेची धुलाई करत पाकला '४४० व्होल्टचा धक्का'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमार यादवनं अमेरिकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानलाही ४४० व्होल्टचा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कॅप्टन्सीच्या पदार्पणात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी साकारली. या स्पर्धेत कॅप्टन्सीतील पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कॅरेबियन ख्रिस गेलच्या नावे आहे. २००९ च्या हंगामात गेलनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावांची खेळी केली होती. हा वर्ल्ड रेकॉर्ड वाचला. पण सूर्यानं या सामन्यात बाबर आझमच्या विक्रमाला सुरुंग लावत पाकला ४४० होल्टचा झटकाच दिला आहे.
भारताविरुद्ध सामन्याच्या बहिष्काराचा फेरविचार करा; श्रीलंकेची पाकला विनंती, PCB ची सरकारशी चर्चा
बाबरनं टीम इंडियाविरुद्धच साधला होता हा डाव
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २०२१ च्या हंगामात पाकिस्तान संघाचे नेतृत्व करताना बाबर आझमनं भारताविरुद्ध दुबईच्या मैदानात ६८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर पाक संघाने त्या हंगामात टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवाचा बदला सूर्यकुमार यादवनं त्याचा विक्रम मोडीत काढत घेतला आहे.
- टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कॅप्टन्सीच्या पदार्पणात सर्वोच्च धावा करणारे बॅटर
- ८८ - ख्रिस गेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल (२००९)
- ८४* - सूर्यकुमार यादव विरुद्ध अमेरिका, वानखेडे (२०२६)
- ६८* - बाबर आझम विरुद्ध भारत, दुबई (२०२१)
- ६५ - महेला जयवर्धने विरुद्ध कॅनडा, जोहान्सबर्ग (२००७)
- ६१ - मोहम्मद अशरफुल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जोहान्सबर्ग (२००७)
संकटमोचक ठरला सूर्या
सूर्यकुमार यादवनं अमेरिकेविरुद्दच्या सामन्यात केलेली खेळी ही अवस्मरणीय अशीच होती. अमेरिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारताची अवस्था ७७ धावांत ६ विकेट अशी बिकट केली होती. अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत टीम इंडिया शंभरीच्या आत गुंडाळते की, काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सूर्यकुमार यादवनं १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८४ धावांच्या नाबाद खेळीसह संघाला अडचणीतून बाहेर काढले. संघाने केलेल्या एकूण धावसंख्येच्या निम्म्याहून अधिक धावा या सूर्यानं केल्या. टी-२० मध्ये क्वचितच अशी खेळी पाहायला मिळते.
Web Summary : Suryakumar Yadav's unbeaten 84 against the USA rescued India from a precarious position in the T20 World Cup. His innings, featuring ten fours and four sixes, surpassed Babar Azam's previous captaincy record. Yadav’s match-winning knock propelled India to victory.
Web Summary : सूर्यकुमार यादव के नाबाद 84 रनों की पारी ने टी20 वर्ल्ड कप में भारत को बचाया। उनकी पारी में दस चौके और चार छक्के शामिल थे, और उन्होंने बाबर आज़म के पिछले कप्तानी रिकॉर्ड को तोड़ दिया। यादव की मैच जिताऊ पारी ने भारत को जीत दिलाई।