Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ती मला नेहमी सांगते, थोडा वेळ घे!” सूर्या दादानं शेअर केली देविशा वहिनीसोबतच्या संवादाची खास गोष्ट

सोशल मीडियापासून दूरावा अन् परफेक्ट माइंडसेटचा मंत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:00 IST

Open in App

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूरच्या मैदानातील टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय इशान किशन याने आक्रमकत अंदाजात फटकेबाजी करताना ७६ धावांचे योगदान दिले. दोगांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात २८ चेंडू आणि ७ विकेट्स राखून विजय नोंदवला. १५ महिन्यांनी सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळाले. त्याच्या दमदार अर्धशतकी खेळीत अर्धांगिनीची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली. खुद्द सूर्यकुमार यादवनं यासंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ती मला नेहमी सांगते की...

दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनच्या साथीनं १२२ धावांची दमदार भागीदारीसह संघाला विश्वविक्रमी विजय मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. यात तो इशान किशनसोबत गप्पा गोष्टी करताना पाहायला मिळते.  या व्हिडीओमध्ये सूर्या आपल्या फॉर्मबाबत म्हणतो की, "कधी-कधी असं होतं की, जेव्हा मी घरी जातो, तेव्हा माझ्या घरीही एक कोच बसलेली असते. जिच्याशी माझं लग्न झालं आहे. ती मला नेहमी सांगते की थोडा वेळ घे. तिने मला खूप जवळून पाहिलं आहे, त्यामुळे ती माझं मनही ओळखते.  मी तिचा सल्ला मनावर घेतला अन् संयमी दाखवल्यानं कमबॅकचा मार्ग सोपा झाला." असे म्हणत आपल्या दमदार खेळीत पत्नी देविशा शेट्टीचा मोठा वाटा असल्याची गोष्ट सूर्यकुमार यादवनं शेअर केली आहे.

धावांचा पाऊस आणि षटकारांचा विक्रम! सूर्यकुमारने एकाच खेळीत मोडले विराटचे दोन खास रेकॉर्ड्स

सोशल मीडियापासून दूरावा अन् परफेक्ट माइंडसेटचा मंत्र 

नेट्समध्ये चांगली बॅटिंग करतोय हे मला माहित होते. ते मी  सातत्याने लोकांना सांगतही होतो. पण जोपर्यंत सामन्यांत धावा होत नाहीत, तोपर्यंत आत्मविश्वास येत नाही. मला २-३ दिवसांची चांगली विश्रांती मिळाली, मी घरी गेलो, सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहिलो. गेल्या तीन आठवड्यांत मी उत्तम सराव केला. परफेक्ट माइंडसेटसह मैदानात उतरलो अन् उत्तम रिझल्ट मिळाला, अशी गोष्टही सूर्यानं यावेळी सांगतिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : "She always tells me, take some time!": Surya Dada shares secret

Web Summary : Suryakumar Yadav credits his wife, Devisha Shetty, for his comeback innings. Her advice to take time and her understanding of his mindset helped him stay patient and score an unbeaten 82 against New Zealand. Yadav also distanced himself from social media and focused on training.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौरासूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ