SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल

IND vs SA T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव झाल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव संतापला आहे. गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफशी त्याने केलेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 08:53 IST2026-02-23T08:49:51+5:302026-02-23T08:53:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Suryakumar Yadav angry Video: Captain Surya upset after humiliating defeat against SA! Seen talking to Gambhir and support staff in dugout; VIDEO goes viral IND vs SA T20 World Cup 2026 | SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल

SA विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर कॅप्टन सूर्या नाराज! डगआऊटमध्ये गंभीर, सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसला; VIDEO व्हायरल

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या ७६ धावांच्या दारूण पराभवानंतर भारतीय गोटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव प्रचंड नाराज दिसला. डगआऊटमध्ये त्याने हेड कोच गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफसोबत जोरदार चर्चा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. संपूर्ण संघ १८.५ षटकात केवळ १११ धावांवर गारद झाला. या पराभवामुळे भारताचा सेमीफायनलचा मार्ग आता खडतर झाला आहे. सामन्यानंतर डगआऊटमध्ये सूर्या खूपच आक्रमक मूडमध्ये दिसला. गंभीरने आखलेली रणनीती फेल गेल्याने सूर्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सूर्या हातवारे करत गंभीर आणि इतरांशी काहीतरी गंभीर विषयावर बोलताना दिसत आहे.

बॅटर्स ठरले व्हिलन...

ईशान किशन: खातेही उघडू शकला नाही.

तिलक वर्मा: चुकीचा शॉट निवडून विकेट गमावली (१ धाव).

अभिषेक शर्मा: स्वस्तात बाद (१५ धावा).

शिवम दुबे: सर्वाधिक ४२ धावा केल्या, पण कोणाचीही साथ मिळाली नाही.

गोलंदाजीतील उणीवा
जसप्रीत बुमराहने सुरुवातीला ३ विकेट्स घेऊन आफ्रिकेला संकटात टाकले होते, पण डेव्हिड मिलर (६३) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (४५) यांनी भारतीय फिरकीपटूंना झोडून काढले. वरुण चक्रवर्तीने ४ षटकात तब्बल ४७ धावा बहाल केल्या.

आता 'करो या मरो'ची स्थिती
भारताला आता सेमीफायनल गाठण्यासाठी झिम्बाब्वे (२६ फेब्रुवारी) आणि वेस्ट इंडिज (१ मार्च) विरुद्धचे दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागणार आहेत. त्यात झिम्बाब्वे हा जायंट किलर संघ ठरला आहे. यामुळे भारताला सावध खेळी करावी लागणार आहे. 

Web Title : SA के खिलाफ अपमानजनक हार के बाद कप्तान सूर्या नाराज़; वीडियो वायरल

Web Summary : दक्षिण अफ्रीका से करारी हार के बाद कप्तान सूर्या नाराज़ दिखे। कोच और सपोर्ट स्टाफ के साथ गहन चर्चा करते दिखे। 188 रनों का पीछा करते हुए भारत की बल्लेबाजी ढह गई, जिससे सेमीफाइनल की उम्मीदें खतरे में पड़ गईं। अब जिम्बाब्वे और वेस्टइंडीज के खिलाफ जीत जरूरी है।

Web Title : Captain Surya Upset After Humiliating Defeat Against SA; Video Viral

Web Summary : Following a crushing defeat to South Africa, Captain Surya appeared upset. He was seen in deep discussion with the coach and support staff. India's batting collapsed chasing 188, jeopardizing their semifinal chances. Wins against Zimbabwe and West Indies are now crucial.