Join us

"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव

मुलींनो तुम्ही 'त्या' गोष्टीची चिंता करू नका!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:10 IST

Open in App

Sunil Gavaskar Warns World Champions Indian Women Cricket Team : घरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत इतिहास रचला. २ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताच्या लेकींनी पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशात जल्लोषाचे वातावरण आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फुकट्या अन् फायदा उठवणाऱ्या लोकांपासून सावधान!

ऐतिहासिक विजयानंतर भारतीय हिला संघावर  बक्षीसांची 'बरसात' होत आहे. अनेकांची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जाहिरातींचा मोठा ओघच सुरु झाला आहे. यादरम्यान भारताच्या विश्वविजेत्या लेकींसाठी क्रिकेट जगतातील महान फलंदाज लिटल मास्टर सुनील गावसकरांनी खास संदेश दिला आहे. "हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही आपला फायदा बघतील. त्याच्यापासून  सावध राहा." अशा शब्दांत गावकरांनी शब्द देऊन खेळाडूंचा अनादर करणाऱ्या मंडळींंना टोला हाणला आहे.

'सिक्सर क्वीन'ला सरकारी नोकरी! विकेटमागे बॅटरला 'अरेस्ट' करणारी २२ वर्षीय रिचा थेट DSP

तुमच्या यशाचा ते स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतील

गावसकरांनी मिड-डेमध्ये लिहिलेल्या स्तंभलेखात म्हटलंय की, "मुलींनो एक गोष्ट लक्षात ठेवा. काहीजण तुमच्या यशाचा वापर करून स्वतःचा प्रचार करतील. अशा लोकांपासून सावध राहा. विश्वचषक स्पर्धेनंतर जाहिरातदार आणि ब्रँड्स लगेच पुढे येतात. खेळाडूंचे अभिनंदन करताना ते वर्तमानपत्रातील संपूर्ण पानावर जाहिरात छापतात किंवा होर्डिंग्ज लावतात. पण प्रत्यक्षात ही मंडळी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना काही देत नाहीत. अनेकजण फक्त फुकट प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीमच्या यशाचा उपयोग करतात. १९८३ मध्ये आम्ही ते अनुभवले आहे."

मुलींनो तुम्ही 'त्या' गोष्टीची चिंता करू नका!  

गावसकरांनी पुढे म्हटलंय की, "जर एखाद्याने शब्द देऊन पुरस्कार दिला नाही तर निराश होऊ नका. भारतात मोठमोठ्या घोषणा करणारे लोक अनेकदा आपला शब्द पाळत नाहीत. अनेक ब्रँड्स आणि जाहिरातदारांना फक्त स्वतःचं प्रमोशन करायचं असतं. १९८३ मध्ये पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर हा अनुभव घेतला आहे. आम्हालाही त्यावेळी अनेकांनी वचने दिली. पण त्याची पूर्तता कधीच झाली नाही. मुलींनो जर हे निर्लज्ज लोक तुमच्या यशाचा वापर हा स्वतःच्या फायद्यासाठी  करत असतील, तर त्याची चिंता करू नका. खरं प्रेम आणि सन्मान तुम्हाला देशाकडून आधीच मिळाला आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Gavaskar warns cricket champions: Beware of those exploiting your success.

Web Summary : Sunil Gavaskar cautions the victorious Indian women's cricket team about individuals seeking to exploit their success for personal gain. He advises them to be wary of empty promises and those who prioritize self-promotion over genuine recognition, drawing from his own experiences after the 1983 World Cup win.
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघसुनील गावसकरआयसीसी महिला विश्वचषक २०२५हरनमप्रीत कौरस्मृती मानधनाजेमिमा रॉड्रिग्ज