Join us

Sunil Gavaskar:"तुम्ही तुमच्या क्रिकेटवर लक्ष द्या...", सुनील गावस्कर यांनी IPL च्या टीकारांना सुनावले 

सुनिल गावस्कर यांनी IPL वर टीका करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 12:43 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी इंडियन प्रीमियर लीगवर (IPL) टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला काही खेळाडूंना टोलाही लगावला आहे. दोन्हीही बलाढ्य देशांना आपाआपल्या देशांची स्थिती पाहायला हवी असे गावस्करांनी म्हटले. इतर देशातील खेळाडूंनी भारताच्या क्रिकेटमध्ये हस्तक्षेप न करता आपल्या देशातील क्रिकेटवर लक्ष केद्रींत करावे असा सल्लाही यावेळी गावस्करांनी दिला. 

गिलख्रिस्टने केली होती IPL वर टीकाऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डम गिलख्रिस्टने आयपीएलच्या वाढत्या दबदब्यावर टीका केली होती. याच टीकेला गावस्करांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. डम गिलख्रिस्टने आयपीएलच्या वाढत्या दबदब्यावर प्रश्न उपस्थित करून वादाला निमंत्रण दिले होते. आयपीएलचा वाढता प्रसार जागतिक क्रिकेटसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्याने म्हटले होते. याशिवाय आयपीएलच्या वाढत्या मक्तेदारीमुळे आपण चिंतेत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने सांगितले होते. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि यूएईत होणाऱ्या टी-२० लीगमधील जास्तीत जास्त संघ आयपीएलमधील फ्रँचायझींनी खरेदी केले आहेत. 

काय म्हटले गावस्करांनी?एका वेबसाइटसाठी लिहलेल्या लेखामध्ये गावस्करांनी म्हटले, "आयपीएलमुळे इतर क्रिकेट संघाच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा बोलले जात आहे. जसे की दक्षिण आफ्रिकेची टी-२० लीग आणि यूएईची टी-२० लीग, यांच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. काही बलाढ्य देशांनी याच्यावर टीकाटिप्पणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या देशातील क्रिकेटच्या हिताबद्दल विचार करावा आणि आम्ही काय करत आहोत याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही आमच्या फायद्याप्रमाणे निर्णय घेऊ तुम्ही सांगाल तसे नाही."

"ऑस्ट्रेलियाने त्यांचे बिग बॅश लीगचे वेळापत्रक देखील ठरवले आहे की त्यांचे करार केलेले खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध असतील. मात्र यूएई आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगचे वेळापत्रक एकाच वेळी असल्याने याची ऑस्ट्रेलियाला चिंता भासत आहे. त्यामुळे काही ऑस्ट्रेलियन खेळाडू बीग बॅश लीग सोडून या लीगमध्ये खेळू शकतात म्हणून कांगारूच्या खेळाडूंना चिंता वाटत आहे", असे सुनिल गावस्कर यांनी आणखी म्हटले. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाइंग्लंडसुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२इंडियन प्रीमिअर लीगबीसीसीआय
Open in App