ऑस्ट्रेलियचा माजी फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिल ( Stuart MacGill) याचे मागील महिन्यात घराजवळून गनपॉइंटवर अपहरण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. पोलिसांनी यासंबंधित काही लोकांना अटक केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांच्या टोळीनं मॅकगिल याचे अपहरण केले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये एक व्यक्ती हा मॅकगिल याची गर्लफ्रेंड मारिया ओ'मीघर ( Maria O' Meagher) हिचा भाऊ निघाला. पण, मारियानं या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसून भावाशी संबंध कधीच तोडल्याचे सांगितले. ३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!
मॅकगिल याचा ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. त्यानं १९९८ ते २००८ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या कारकिर्दीत तो अनेकदा शेन वॉर्नच्या कामगिरीमागेच झाकोळला गेला. त्यामुळे वॉर्नसारखी प्रसिद्धी त्याला मिळू शकली नाही. त्यानं ४४ कसोटींत २०८ विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लेग स्पिनर्समध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये न्यू साऊथ वेल्सचे प्रतिनिधित्व करताना त्यानं ३२८ विकेट्स घेतल्या आहेत. २००८मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले'
मारिया काय म्हणाली?स्टुअर्ट आणि मी अजूनही एकत्र आहोत. आम्ही अजूनही भयभीत आहोत. मला इथे सुरक्षित वाटत नाही आणि नेमकं काय घडलं हेच कळत नाही. मी आणि माझा भाऊ दोघंही परस्परविरोधी आयुष्य जगतो. आम्ही भावंड असलो तरी आमच्यात जवळीक नाही. स्टुअर्ट आणि माझे कुटूंब अशा दुहेरी कात्रीत मी अडकली आहे. माझ्या कुटुंबीयांसाठीही हा मोठा धक्का आहे.''