३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:11 AM2021-05-08T11:11:37+5:302021-05-08T11:15:15+5:30

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मुंबईत परतताच कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी विराटनं पुढाकार घेतल आहे. विराटनं युवा सेनेसोबत या लढाईत मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

3.6 crores in less than 24 hours; Virat Kohli and wife Anushka Sharma Overwhelmed with the response against corona fight | ३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!

३.६ कोटी, तेही २४ तासांहून कमी कालावधीत; विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या कोरोना लढ्याला मोठं यश!

Next

विराट कोहली ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले आहे आणि २४ तासांहून कमी कालावधीत त्यांनी ३.६ कोटी रक्कम जमाही केली आहे. यातील २ कोटी रक्कम ही विराट-अनुष्का यांनी दान केली आहे. या मोहिमेला मिळलाले प्रतिसाद पाहून विराट व अनुष्का यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. निम्मा पल्ला पार केला आहे आणि आपलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया, अशी पोस्ट दोघांनी लिहीली आहे. 'ऑस्ट्रेलियन खेळाडू दुटप्पी; कोरोनामुळे द. आफ्रिका दौरा रद्द केला अन् भारतात IPL खेळायला आले'

Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करत आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ''देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे.  अनुष्का आणि मी Kettoवर एक मोहीमु सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे. तुमचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. आयुष्य वाचवण्यासाठी छोटीशी मदतही खूप मोठी असते.'' असे ही दोघांनी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे. 


दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गतवर्षी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची होती.

आयपीएल स्थगित झाल्यानंतर मुंबईत परतताच कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी विराटनं पुढाकार घेतल आहे. विराटनं युवा सेनेसोबत या लढाईत मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. युवा सेनेचा कोर कमिटी सदस्य ( Core - committee Member ) राहुल एन कनाल याच्यासोबत विराटनं चर्चा केली आणि रणनिती ठरवली. या भेटीचे फोटो राहुल कनालनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कनालनं लिहिलं की,''आज आपल्या कर्णधाराची भेट घेतली. कोरोनाविरुद्ध त्यानं जे युद्ध छेडले आहे, ते पाहून त्याच्या प्रतीचा आदर आणखी वाढला. त्याच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच प्रार्थना करतो.''  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 3.6 crores in less than 24 hours; Virat Kohli and wife Anushka Sharma Overwhelmed with the response against corona fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app