Join us

चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!

श्रीलंकेविरुद्ध वनडेतील पहिली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:36 IST

Open in App

Smriti Mandhana Records With 11th W ODI Hundred :  श्रीलंकेत सुरु असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील फायनलमध्ये स्मृती मानधनाने शतकाला गवसणी घातली. या मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक हुकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही तिला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. पण फायनलमध्ये मालिकेतील कसर भरून काढताना स्मृती मानधना हिने वनडे कारकिर्दीतील ११ व्या शतकासह खास विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.  महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारी ती तिसरी महिला क्रिकेटर  ठरलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

महिला वनडेत सर्वाधिक शतके कुणाच्या नावे?

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन मेग लेनिंगच्या नावे आहे. आतापर्यंत तिने १५ शतके झळकावली आहेत. त्यापाठोपाठ या यादीत न्यूझीलंड सुझी बेट्सचा नंबर लागतो जिने १३ शतके झळकावली आहेत. भारताची उप कर्णधार स्मृती मानधना  हिने श्रीलंकेविरुद्धच्या शतकासह हा विक्रम मोडण्याच्या दिशेनं आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. 

गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर

श्रीलंकेविरुद्ध वनडेतील पहिली सेंच्युरी

श्रीलंकेविरुद्धच्या फायनल सामन्यात स्मृती मानधना हिने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी करताना १५ चौकार आणि २ षटकार मारले. अट्टापट्टूच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार मारत तिने वनडे कारकिर्दीतील ११ वे शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले. १०२ सामन्यात स्मृतीच्या खात्यात आता वनडेत ४ हजार ४७३ धावांची नोंद झालीये. यात ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या शतकातील खास गोष्ट ही की, श्रीलंकेविरुद्ध तिने पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. स्मृती मानधना हिने प्रतिकाच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर तिने हरलीन देओलसोबत १२० धावांची दमदार भागीदारी करत संघाची स्थिती आणखी मजबूत केली. 

टॅग्स :स्मृती मानधनाभारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ