Join us

गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर

विराट कोहली किंवा बीसीसीआयकडून यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:06 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघ २० जून पासून इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यात आता विराट कोहलीच्या निवृत्तीची चर्चा रंगत आहे. यासंदर्भात विराट कोहली गेल्या महिन्याभरापासून BCCI शी चर्चा करत असल्याची माहिती आता समोर आलीये. इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीनं खेळावे, यासाठी बीसीसीआयनं त्याला विनंती केल्याचेही बोलले जाते. पण विराट कोहलीचा अंतिम निर्णय अजूनही गुलदस्त्यातच आहे. कोहलीच्या निवृत्तीमागे कॅप्टन्सी हा मुद्दा असल्याचा दावाही एका वृत्तातून करण्यात आला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील गोष्ट 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोहलीला हवी होती कॅप्टन्सी?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामध्ये केलेल्या दाव्यानुसार, विराट कोहली हा पुन्हा कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी इच्छुक होता. त्याने पुन्हा कॅप्टन्सी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण बीसीसीआयने त्याला साफ नकार दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भविष्यातील विचार करून नव्या चेहऱ्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्तीचा विचार केल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. विराट कोहली किंवा बीसीसीआयकडून यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या दाव्यात किती तथ्य आहे, त्याचा अंदाज लावणे तसे कठीणच आहे. 

टीम इंडियासाठी कायपण! किंग कोहली विचार बदलून कसोटी खेळण्यासाठी तयार होणार?

गंभीरही युवा खेळाडूंकडे नेतृत्व देण्याच्या बाजूनं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्रात बीसीसीआय  दिर्घकालीन विचार करून संघ बांधणी करण्यावर जोर देत आहे. घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवणा पराभव आणि ऑस्ट्रेलियात ओढावलेल्या नामुष्कीनंतर बीसीसीआय कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली होती. टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरलाही असाच गट हवाय ज्यांच्यासोबत मोठ्या कालावधीसाठी काम करता येईल. हेच कनेक्शन  विराट कोहलीच्या निवृतीच्या निर्णयामागे असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघगौतम गंभीर