Yuvraj Singh And Harmanpreet Kaur Had Stadium Stands Named Mullanpur New Chandigarh : दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन युवराज सिंग आणि भारतीय महिला संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा गुरुवारी विशेष सन्मान करण्यात आला. मुल्लनपूर येथील महाराजा यादविन्द्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन क्रिकेटर्सच्या नावाच्या स्टँडचे अनावरण करण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंचा सन्मान
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामन्याला सुरुवात होण्याआधी न्यू पंजाब येथील चंदीगडच्या मैदानात खास कार्यक्रम पार पडला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या कार्यक्रमात दोन्ही खेळाडूंचा सत्कार केला. नव्याने नियुक्त बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मनहास आणि भारतीय महिला संघाच्या सपोर्ट स्टाफचे सदस्यदेखील उपस्थित होते. हरमनप्रीतच्या विश्वचषक सहकाऱ्यांमध्ये हरलीन देओल आणि अमनजोत कौर तसेच फिल्डिंग कोच मुनीष बाली यांनीही समारंभात भाग घेतला होता.
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
विश्वविजेत्या संघातील विजेत्या संघातील महिला खेळाडूंना ११-११ लाखांचे रोख बक्षीस
न्यू पंजाबच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याआधी पंजाब विश्वविजेत्या भारतीय संघातील पंजाबी महिला खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आली. हरमनप्रीत, हरलीन आणि अमनजोत यांना प्रत्येकी ११ -११ लाख रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. मुनीष बाली यांना ५ लाख रुपये प्रदान करण्यात आले.
हरमनप्रीतसह युवीचं क्रिकेटमधील खास योगदान
हरमनप्रीत कौरने अलीकडेच भारतीय महिला संघाला पहिला वहिली वर्ल्ड कप जिंकून देत इतिहास रचला होता. ती भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकून देणारी पहिली महिला कर्णधार ठरली. महिला क्रिकेटमध्ये तिने खास योगदान दिले आहे. याशिवाय युवराज सिंगने भारतीय संघाला २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.