भारत-पाक यांच्यातील तणावामुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धेत सुधारित वेळापत्रकानुसार, पुन्हा सुरु होणार आहे. एका बाजूला उर्वरित सामन्यासाठी IPL फ्रँचायझी संघ तयारीला लागले असताना दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने IPL मध्ये खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना २६ मे पर्यंत मायदेशी परतण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे मुंबई इंडियन्ससह प्लेऑफ्सच्या शर्यतीत असलेल्या अन्य संघांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा परिणाम
आयपीएलच्या १८ व्या हंगामात वेगवेगळ्या फ्रँचायझी संघासोबत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या ८ खेळाडूंचे आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवडलेल्या संघात समावेश आहे. ११ जून २०२५ रोजी लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. कसोटीतील मेगा फायनलची तयारी करता यावी यासाठीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आपल्या खेळाडूंना आयपीएल सोडून मायदेशी परतण्यास सांगितले आहे.
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
बीसीसीआयसोबत सुरुये चर्चा
CSA चे प्रमुख एनोक न्वे यांनी म्हटलंय की, आम्ही यासंदर्भात भारतीय नियामक मंडळासोबत चर्चा करत आहोत. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३१ रोजी इंग्लंडमधील अरुंडेल येथे एकत्रित येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ ते ६ जून दरम्यान झिम्बाब्वे विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर ते लंडनला रवाना होतील. या परिस्थितीत माघार घेता येणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनीही स्पष्ट केले असून २६ मे पर्यंत खेळाडू आयपीएल सोडून माघारी परततील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
मुंबई इंडियन्सला बसेल मोठा फटका
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघात रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. पण त्यांना बोर्डाने परत बोलवले असल्यामुळे मुंबई इंडिन्सचे सेट झालेले गणित मोक्याच्या क्षणी बिघडू शकते. या दोन खेळाडूंशिवाय वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद) मार्को यान्सेन (पंजाब किंग्ज), एडेन मार्करम (लखनऊ सुपरजाएंट्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु), कगिसो रबाडा (गुजरात टायटन्स), आणि ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स) या खेळाडूंची WTC फायनलसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात वर्ण लागली आहे.