Join us

IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 

एक नजर जोहान्सबर्गच्या मैदानात टीम इंडियानं सेट केलेल्या ५ रेकॉर्ड्सवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 23:01 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गच्या दी वाँडरर्स स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने विक्रमी धावसंख्या उभारली. सलामीवीर अभिषेक शर्मा तुफान फटकेबाजी करून परतल्यावर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं निर्धारित २० षटकात भारताच्या धावफलकावर  १ बाद २८३ धावा लावल्या. ही भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विक्रमाशिवाय या जोडीच्या तुफान फटकेबाजीनं अनेक विक्रम सेट झाले. नजर टाकुयात त्या विक्रमांवर...

सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ही २९७ धावा ही आहे. याचवर्षी टीम इंडियानं बांगलादेशविरुद्ध ही धावंसख्या उभारली होती. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्गच्या मैदानात सेट केलेली २८३ धावा ही भारतीय संघाची परदेशातील सर्वोच्च धावसंख्या आहे.  

टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड (two Full Member sides)

६ बाद २९७ धावा-भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद (२०२४)१ बाद २८३ धावा- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग (२०२४)*३ बाद २७८ धावा- अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून (२०१९)३ बाद २६७ धावा- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, तारुबा(२०२३)

एका वर्षात सर्वाधिक ३ शतक झळकणारा फलंदाज ठरला संजू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन वेळा भोपळा पदरी पडलेल्या संजूच्या भात्यातून दुसरे शतक आले. या शतकासह एका कॅलेंडर ईयरमध्ये ३ शतक झळकवणारा संजू सॅमसन पहिला फलंदाज ठरलाय. याआधी त्याने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात हैदराबादच्या मैदानात शतकी खेळी केली होती. 

पहिल्यांदाच टी-२०i मध्ये एका डावात पाहायला मिळाले दोन शतकवीर

संजू सॅमसनसह या सामन्यात तिलक वर्मानं सलग दुसरे शतक झळकावले. यासह आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात दोन शतके पाहायला मिळाली. हा देखील एक रेकॉर्डच आहे.

सर्वात मोठी भागीदारी

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. 

एका डावात सर्वाधिक षटकार

भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २३ षटकार मारले. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावे झाला. याआधी भारतीय संघानं एका डावात २२ षटकार मारल्याची नोंद होती. भारतीय संघाकडून तिलक वर्मानं सर्वाधिक १० त्याच्यापाठोपाठ संजू सॅमसन ९ आणि अभिषेख शर्मानं ४ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसंजू सॅमसनतिलक वर्माद. आफ्रिका