Join us

संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम

दोघांमध्ये कोण आधी शतक झळकवणार अशी जणू स्पर्धाच सुरु होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 22:13 IST

Open in App

जोहान्सबर्गच्या मैदानात संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी चौकार-षटकारांची अक्षरश: बरसात केली. एका बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पडले होते दुसऱ्या बाजूला संजू आणि तिलक या दोघांमध्ये शतक आधी कोण करणार अशी जणू स्पर्धाच सुरु होती. संजू सॅमसन यानं दोन भोपळ्यानंतर ५१ चेंडूत शतक साजरे केले. एका वर्षात ३ टी-२० शतक झळकवणार तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

एका डावात दोन शतकवीर, संजू-तिलक वर्मानं सेट केला नवा रेकॉर्ड

त्याच्यापाठोपाठ तिलक वर्मानं ४१  चेंडूत सलग दुसरे शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो संजू सॅमसननंतर दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधीच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील पहिलं शतक पाहायला मिळालं होते. पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर येऊन त्याने शतकी पराक्रमानं लक्षवेधून घेतलं. या दोघांच्या शतकासह आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात दोन शतकं झळकवण्याचा खास विक्रम या भारतीय जोडीनं सेट केला आहे.

जोडीनं षटकार-चौकारांची आतषबाजी करत सेट केले अनेक विक्रम

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी तुफान फटकेबाजी करत अनेक विक्रम नोंदवले आहेत. दोघांनी टीम इंडियाकडून सर्वात मोठी भागीदारी रचण्याचा विक्रम केला. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये टॉप १० टीममधील ही पहिली जोडी ठरलीये ज्यांनी एकाच टी-२० सामन्यात शतकी खेळी करून दाखवलीये. अन्य कोणत्याही फलंदाजांना जमलं नाही ते या दोघांनी करून दाखवलं आहे. हे विक्रम सेट करण्याआधी दोघांच्या फटकेबाजीत दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातील भारतीय संघाच्या विक्रमी धावसंख्येचीही  नोंद झाली.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसंजू सॅमसनतिलक वर्मा