Join us

मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!

वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात दोन विकेट्स घेत सामना एकतर्फी केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 00:08 IST

Open in App

संजू सॅमसनसह भारतीय फलंदाजांनी डरबनच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यातील लढाई २०० पारची केली. त्यानंतर फिरकीपटूंनी आपली छाप सोडत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना स्वस्तात तंबूत धाडत विजयाचा मार्ग अगदी सुकर केला. यात वरुण चक्रवर्ती याने मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या दोन भिडूंना एकाच षटकात तंबूत धाडल्याचे पाहायला मिळाले. 

ज्या दोघांवर खिळल्या होत्या नजरा त्यांचा वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात खेळ केला खल्लास 

२०३ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या सर्व आशा या हेन्रिक क्लासेन आणि डेविड मिलरवर खिळल्या होत्या. जोडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामन्यात काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती होती. क्लासेननं एक उत्तुंग दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर ८६ धावा असताना वरुण चक्रवर्तीन क्लासेनला आपल्या जाळ्यात फसवलं.  

आधी क्लासेनला फसवलं, त्यापाठोपाठ मिलरही लागला वरुणच्या गळाला

११ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फकला अन् कोणतीही चूक न करता अक्षर पटेलनं त्याचा झेल टिपला. क्लासेन याने २२ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २५ धावांची खेळी केली. याच षटकातील पाचव्या चेंजूवर वरुण चक्रवर्तीनं डेविड मिलरचाही खेळ खल्लास केला. त्याने २२ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८ धावांची खेळी केली. 

४ षटकात २५ धावा खर्च करत घेतल्या ३ विकेट्स 

दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील या दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेण्याआधी वरुण चक्रवर्तीनं स्फोटक वाटणाऱ्या रायन रिकलटन याला आपल्या जाळ्यात अडकवलं होते.  वरुण चक्रवर्तीनं आपल्या ४ षटकांच्या कोट्यात २५ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघद. आफ्रिकासूर्यकुमार अशोक यादवसंजू सॅमसन