ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील फिरकीपटू केशव महाराज याने उंच उडी मारत गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावलं आहे. त्याच्या रुपात वनडेत गोलंदाजी नवा गोलंदाज मिळालाय. दुसरीकडे फलंदाजीत शुबमन गिल आपलं अव्वलस्थान टिकवून असला तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली जोडीचं मात्र क्रमवारीतून नावच गायब झाले आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केशव महाराज नंबर वन गोलंदाज
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजीमध्ये केशव महाराज याने दोन स्थानांनी झेप घेत अव्वलस्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात केशव महाराजनं ३३ धावा खर्च करत पाच विकेट्सचा डाव साधला होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याने ६८७ रेटिंग पॉइंट्स आपल्या खात्यात जमा करत नंबर वनचा ताज पटकवलाय. याआधी श्रीलंकेचा महेश तीक्षणा गोलंदाजीत अव्वल होता. तो आता ६७१ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ कुलदीप यादव दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहचला. त्याच्या खात्यात ६५० रेटिंग पॉइंट्स जमा आहेत.
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
बॅटिंगमध्ये शुबमन गिल टॉपला, मात्र रोहित-विराटचं नाव 'गायब'
शुबमन गिल ७८४ रेटिंग पॉइंट्स सह अव्वलस्थानावर कायम आहे. त्याच्याशिवाय आशिया कप स्पर्धेतून डावलण्यात आल्यामुळे चर्चेत असणारा श्रेयस अय्यर हा एकमेव असा भारतीय फलंदाज आहे जो टॉप १० मध्ये दिसतोय. तो ७०४ रेटिंग पॉइंट्ससह सहव्या स्थानावर कायम आहे. पण टी-२० आणि कसोटीतून निवृत्तीनंतर फक्त वनडे खेळताना दिसणार असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे नाव मात्र वनडे क्रमवारीतूनही गायब झालय.
रोहित-विराट वनडेत सक्रीय, मग क्रमवारीत का दिसत नाही त्यांचं नाव?
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी-२० सह कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रमवारीत त्यांचे नाव दिसत नाही ही गोष्ट समजू शकते. पण वनडेत ते सक्रीय असताना ही जोडी वनडे क्रमवारीत का नाही? असा प्रश्न पडू शकतो. आयसीसीच्या नियमानुसार, एखादा खेळाडू कसोटीत १२-१५ महिने आणि टी २० आणि एकदिवसीय सामन्यात ९ ते १२ महिने क्रिकेट पासून दूर असेल तर तो खेळाडू टॉप १०० मधून बाहेर फेकला जातो. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आयपीएल आधी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यामुळेच सध्याच्या घडीला या दोघांची नावे क्रमवारीतून गायब झाल्याचे दिसते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ही जोडी मैदानात उतरल्यानंतर ही नाव पुन्हा क्रमवारीत दिसतील.
Web Title: South Africa Spinner Keshav Maharaj Becomes No 1 Ranked ODI Bowler In ICC Rankings Rohit Sharma Virat Kohli Name Disappear
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.