Join us
Daily Top 2Weekly Top 5

गांगुली म्हणतो, इन्स्टावरचा 'तो' मी नव्हेच!

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह नसतो, परंतु इन्स्टाग्रामवरीत एका पोस्टने गांगुली चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 13:29 IST

Open in App

मुंबई - भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीसोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह नसतो, परंतु इन्स्टाग्रामवरीत एका पोस्टने गांगुली चर्चेत आला आहे. त्यामुळे त्याला इन्स्टावरील 'तो' मी नव्हेच असे म्हणण्याची वेळ आली आहे. ट्विटर अकाऊंटवरून त्याने हे स्पष्ट केले. विशेष म्हणजे इन्स्टावरील त्याच्या नावाच्या अकाऊंटला 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी पराभवानंतर गांगुलीच्या इन्स्टा अकाऊंटवर भारतीय संघाला सल्ला देण्यात आला होता. गांगुलीची ती प्रतिक्रिया अनेक प्रसिद्धी माध्यमांनी अधिकृत समजून त्यावर बातमी केली. त्यात गांगुलीने असे म्हटले होते की, तुम्हाला कसोटी जिंकायची आहे, तर प्रत्येकाने धावा करायला हव्या. विराट कोहलीने चांगली कामगिरी केली आणि त्याच्याप्रमाणे अन्य फलंदाजांनीही शतक करायला हवे. विराटने शतक केले नसते तर भारत दुस-याच दिवशी पराभवाच्या छायेत गेला असता. अजिंक्य रहाणे व मुरली विजय यांनी निर्धाराने फलंदाजी करायला हवी. 

टॅग्स :सौरभ गांगुलीभारत विरुद्ध इंग्लंडक्रीडाइन्स्टाग्रामसोशल मीडिया