कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव!

ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:40 AM2021-05-19T10:40:21+5:302021-05-19T10:40:44+5:30

whatsapp join usJoin us
Sonu Sood praises Karn Sharma for supporting the actor’s foundation in the COVID-19 pandemic | कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव!

कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशाच्या आरोग्य व्यवस्थेलाच हतबल केलं आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) हा सुपर हिरो ठरला आहे. तो आणि त्याची टीम कोरोना काळात अहोरात्र गरजूंना मदत करत आहे. सोनू सूदच्या या टीमला चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) स्टार खेळाडूकडूनही मदत मिळत आहे. सोनू सूदनं स्वतः ही माहिती दिली आणि त्याच्या मदतीचे आभार मानले.  

सोनूनं सांगितलं की CSKचा कर्ण शर्मा ( Karn Sharma) हा कोरोनाच्या लढाईत सातत्यानं मदत करत आहे.  तो म्हणाला,''सोनू सूद फाऊंडेशनला तुमच्या निरंतर पाठिंब्यासाठी खूप-खूप आभार. तुम्ही पुन्हा एकदा देशातील युवकांना प्रेरणा दिली आहे आणि तुमच्यासारखी लोकं जगात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करतात.'' कर्ण शर्मानेही त्याच्या या ट्विटला उत्तर दिले. त्यानं लिहिलं की,''तुम्ही आपल्या देशाचे खरे नायक आहात. तुम्हाला सलाम, असंच काम सुरू ठेवा.'' 



सोनू सूदनं या संकटात भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग व सुरेश रैना यांनाही मदत केली आहे. हरभजन सिंगला रेमडेसवीर इंजेक्शनची गरज होती, तर रैनाला त्याच्या नातेवाईकासाठी ऑक्सिजन सिलेंडर हवा होता. सोनूनं या दोघांना मदत केली होती. 

हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन, 1 रेमडेसीवीर इंजेक्शनची अर्जंट गरज असल्याचं म्हटलं होतं. भज्जीच्या या ट्विटला 10 ते 12 मिनिटांतच सोनूने रिप्लाय दिला. त्यामध्ये, भज्जी थोड्यात वेळात इंजेक्शन तिथे पोहोचलेलं असेल, असे ट्विट सोनू सूदने केलंय. 

वॉर्नर, स्मिथ, मॅक्सवेलनंही मागितली सोनू सूदकडे मदत

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थगित करावे लागले. त्यानंतर बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांकडे जाण्यास सांगितले आहे. परदेशी खेळाडूंसमोर मायदेशात जाण्याचे आव्हान होते. त्यात ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतातून येणाऱ्या विमानसेवा १५ मे पर्यंत रद्द केल्यानं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवचा आसरा घ्यावा लागला आहे. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) यानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी सोनू सूदला मदतीसाठी मॅसेज केल्याचे दाखवण्यात आले आहे. सोनूच्या फॅननं हा फोटो काढला आहे आणि अभिनेत्यानं तो ट्विट करून त्यावर हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. सोनूची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

Web Title: Sonu Sood praises Karn Sharma for supporting the actor’s foundation in the COVID-19 pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.