Join us

कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Shubman Gill Relationship News: भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू आणि आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा त्याच्या फलंदाजीसोबत रिलेशशिपबाबत होणाऱ्या गप्पांमुळेही चर्चेत असतो. आतापर्यंत शुभमन गिलचं नाव अनेक जणींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र तो नेमका कोणासोबत नात्यात आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 18:32 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू आणि आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल हा त्याच्या फलंदाजीसोबत रिलेशशिपबाबत होणाऱ्या गप्पांमुळेही चर्चेत असतो. आतापर्यंत शुभमन गिलचं नाव अनेक जणींसोबत जोडलं गेलं आहे. मात्र तो नेमका कोणासोबत नात्यात आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, आपलं नाव कुणासोबतही जोडून अफवा पसरवल्या जात असल्याने शुभमन गिल त्रस्त झाला असून, त्याने एका मुलाखतीमधून आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत स्पष्ट शब्दात सांगून टाकलं आहे. तसेच मी सध्यातरी सिंगलच आहे, असेही त्याने स्पष्ट केले आहे.

भारतीय क्रिकेट संघात स्थिरस्थावर झाल्यापासून शुभमन गिलचं नाव, सारा तेंडुलकर, अनन्या पांडे, रिद्धिमा पंडित, सोनम बाजवा आणि अवनीत कौर आदींसोबत जोडलं केलं आहे. आता शुभमन गिलने एका मुलाखतीमध्ये आपल्या रिलेशनशिपबाबत उडणाऱ्या अफवांवर बोलताना सांगितले की, मी मागच्या तीन वर्षांपासून सिंगल आहे. माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. माझं नाव वेगवेगळ्या लोकांसोबत जोडलं गेलं आहे. कधी कधी तर अशा अफवा एवढ्या हास्यास्पद असतात की मी ज्यांना कधी भेटलोही नाही अशांशीही माझं नाव जोडलं जातं. तहीही मी या व्यक्तीसोबत नात्यामध्ये आहे, त्या व्यक्तीसोबत नात्यात आहे, असं ऐकायला मिळतं. मी सध्यातरी माझं लक्ष करिअरवर केंद्रित केलेलं आहे, असे त्याने स्पष्ट केले.

शुभमन गिल पुढे म्हणाला की, मी माझ्या क्रिकेटमधील व्यावसायिक करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. वर्षातील ३०० दिवस कुणासोबत राहण्यासाठी माझ्याकडे सध्यातरी वेळ नाही. आम्ही नेहमी कुठे ना कुठे फिरत असतो. त्यामुळे कुणासोबत राहण्यासाठी किंवा वेळ घालवण्याची संधी फारशी मिळत नाही, असेही शुभमन गिल याने सांगितले.   

टॅग्स :शुभमन गिलरिलेशनशिपभारतीय क्रिकेट संघगुजरात टायटन्स