Join us

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्जची मन जिंकणारी कृती! युवा खेळाडूंसाठी जे केलं त्याचं होतंय कौतुक

Smriti Mandhana & Jemimah Rodrigues - स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज हे भारतीय महिला क्रिकेटमधील नावाजलेलं नाव.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 16:19 IST

Open in App

Smriti Mandhana & Jemimah Rodrigues ( Marathi News ) - स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज हे भारतीय महिला क्रिकेटमधील नावाजलेलं नाव. महाराष्ट्राच्या या पोरींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नव्हे तर महिलांच्या बिग बॅश लीगमध्येही आपली छाप पाडली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील या आता सीनियर खेळाडू आहेत आणि त्यांनी एक चांगला आदर्श युवा खेळाडूंसमोर ठेवला आहे. या दोन्ही खेळाडू सध्या सीनियर महिला आंतर विभागीय वन डे ट्रॉफीत पश्चिम विभाग संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि आज त्यांचा सामना उत्तर विभागाशी झाला. पण, या सामन्यात या दोघांनी ठेवलेा आदर्श कौतुकास पात्र ठरतोय.

२० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार

पश्चिम विभाग संघाने आजच्या सामन्यात ३३२ धावांनी उत्तर विभागावर दणदणीत विजय मिळवला. पश्चिम विभागाच्या ९ बाद ३९३ धावांच्या प्रत्युत्तरात उत्तर विभागाचा संपूर्ण संघ ६१ धावांत तंबूत परतला. पश्चिम विभागाकडून टी हसबनीस ( ८९), हुमैरा काझी ( ५१), राधा यादव ( ७६), ए पाटील ( ६८) यांनी अर्धशतकी खेळी केली, तर यास्तिका भाटीया ( ३८) व एस शिंदे ( ३६) यांनीही चांगला खेळ केला. जेमिमा ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आली. उत्तर विभागाचा संपूर्ण संघ २६.५ षटकांत तंबूत परतला. ए पाटीलने ४, राधा यादवने ३, एन पटेलने २ व सायली सातघरेने १ विकेट घेतली.

मागील सामन्यात स्फोटक शतक झळकावणाऱ्या स्मृती मानधनाने आजच्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी विश्रांती घेतली. तिच्या गैरहजेरीत जेमिमाने कर्णधारपदाची धुरा सांभाळली, परंतु प्रथम फलंदाजी स्वीकारूनही जेमिमा ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिनेही युवा खेळाडूंना संधी दिली. सीनियर खेळाडूंच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.  

टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघ