२० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) मंगळवारी वादळी शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:08 PM2024-01-30T17:08:18+5:302024-01-30T17:08:33+5:30

whatsapp join usJoin us
Smriti Mandhana return to form in style, stroking 136 in just 118 balls as West Zone chase 265 to beat East Zone by 7 wickets | २० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार

२० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Marathi News )  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) मंगळवारी वादळी शतक झळकावले. बीसीसीआयच्या Senior Womens Inter Zonal One Day Trophyत पश्चिम विभागाचे नेतृत्व सांभळताना स्मृतीने कॅप्टन्स इनिंग खेळली. तिच्या शतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने ७ विकेट्स व ४९ चेंडू राखून पूर्व विभाग संघाचा सहज पराभव केला. पश्चिम विभागाच्या विजयात ओपनर यास्तिका भाटीया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनीही हातभार लावला.


पूर्व विभागाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २६४ धावा उभ्या केल्या. कर्णधार दीप्तीने १३७ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. उमा चेत्रीने ४९ चेंडूंत ५४ धावा केल्या, तर सुश्री दिव्यादर्शनी ( ३१) व जिंतिमणी कलिता ( २६ ) यांनी धावसंख्येत योगदान दिले. पश्चिम विभागाच्या ए पाटीलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि पूर्व विभागाच्या मधल्या फळीला हतबल केले. सायली सातघरेने दोन, तर एस पोखरकर व पी नाईक यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.


लक्ष्याचा पाठलाग करताना यास्तिका व स्मृती यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. यास्तिका ४५ चेंडूत ६ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४२ धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमासह दुसऱ्या विकेटसाठी स्मृतीने १५४ धावा जोडल्या. स्मृती ११८ चेंडूंत १३६ धावांवर बाद झाली. तिने १५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने २० चेंडूंत ९० धावा कुटल्या. जेमिमाच्या खेळीला ७२ धावांवर ( ७९ चेंडू) ब्रेक लागला. तोपर्यंत पूर्व विभागाच्या हातून सामना निसटला होता. पश्चिम विभागाने ४१.५ षटकांत ३ बाद २६५ धावा करून बाजी मारली. 

Web Title: Smriti Mandhana return to form in style, stroking 136 in just 118 balls as West Zone chase 265 to beat East Zone by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.