Join us

स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...

वर्ल्ड कपमध्ये ही बॅटर स्मृतीला देतीये टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:33 IST

Open in App

Smriti Mandhana ICC ODI Batting Ranking : भारतीय महिला संघाची उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. पण त्यातही तिनं आयसीसीच्या महिला एकदिवसीय बॅटरच्या क्रमवारीत आपलं अव्वलस्थान कायम राखलं आहे. स्मृतीच्या खात्यात ७९१ रेटिंग पॉइंट्स असून ती इंग्लंडच्या नॅट सायव्हर-ब्रंटपेक्षा ६० पॉइंट्सच्या फरकाने पुढे दिसते. जर आगामी सामन्यात तिने हिट शो दिला नाही तर नंबर वनचा ताज धोक्यात येईलच, याशिवाय टीम इंडियाच्या अडचणीतही भर पडेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

फ्लॉप ठरली टॉपरला 

घरच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत स्मृती मानधना हिने बॅक टू बॅक शतकी खेळीसह वर्ल्ड कपसाठी तयार असल्याच संकेत दिले. पण श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तिला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अवघ्या ८ धावांवर ती बाद झाली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिने दुहेरी आकडा गाठला. पण २३ धावांवर अडखली. आपले अव्वलस्थान कायम राखण्यासाठी आणि संघाचा विजय सिलसिला कायम ठेवण्यासाठी आता तिला ट्रॅकवर परतावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ती मोठी खेळी करून आपलं वनडेतील अव्वल स्थान भक्कम करण्याच्या इराद्याने मैदान उतरेल.

कोण आहे Ravi Kalpana? ३ डावात फक्त ४ धावा; तरी मितालीसह स्टेडियम स्टँडला देण्यात आलं तिचं नाव

वर्ल्ड कपमध्ये ही बॅटर स्मृतीला देतीये टक्कर

महिला एकदिवसीय क्रमवारीतील बॅटरच्या यादीत ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी ७१३ रेटिंग पॉइंट्स मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीच्या जोरावर तझमिन ब्रिट्स ७०६ रेटिंग पॉइंट्स सह चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या बॅटरनं न्यूझीलंड विरुद्धच्या शतकी खेळीसह  कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक ५ शतकासह स्मृतीचा विक्रम मोडीत काढला आहे. स्मृती आणि ब्रिट्स यांच्यात यंदाच्या हंगामात तगडी स्पर्धा पाहायला मिळेल. तिच्यासोबतच्या शर्यतीत स्मृती सध्या बॅकफूटवर असली तरी दमदार कामगिरीसह ती  जबरदस्त कमबॅक करेल, अशी अपेक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana tops rankings despite failures; must improve now!

Web Summary : Smriti Mandhana retains top ICC ODI ranking despite recent poor scores in the World Cup. While leading with 791 points, a failure to perform in upcoming matches could jeopardize her position and impact India's chances. Rivals like Beth Mooney and Tazmin Brits are close behind.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघआयसीसी