Syed Mushtaq Ali Trophy Quarterfinals Schedule Venue Timings : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. साखळी फेरी आणि प्री क्वार्टर फायनलनंतर सेमीत एन्ट्री मारण्यासाठी ८ संघात तगडी फाईट बघायला मिळणार आहे. मुंबई, बडोदा, दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, विदर्भ, सौराष्ट्र हे संघ आधीच क्वार्टर फायनलमध्ये पोहचले होते. त्यानंतर बंगाल आणि यूपीच्या संघाने स्पर्धेत आगेकूच केलीये. इथं एक नजर टाकुयात क्वार्टरफायनलमध्ये कोणता संघ कधी, कुठं आणि कुणाविरुद्ध मैदानात उतरणार त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या या २ वेगवेगळ्या मैदानात रंगणार उपांत्यपूर्व फेरीतील ४ सामने
उंपात्यपूर्व फेरीतील सर्वच्या सर्व चार सामने हे ११ डिसेंबरला बंगळुरुच्या दोन वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेला आणि यंदाच्या हंगामात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड रचणाऱ्या बडोदा संघासह बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेश हे संघ आपला सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळतील. दुसरीकडे मुंबई, विदर्भासह सौराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा संघ अलूर क्रिकेट स्टेडियमवर आपले सामने खेळतील.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यांची वेळ काय
चिन्नास्वामी स्टेडियमवर सकाळी ११ वाजता बडोदा विरुद्ध बंगाल यांच्यातील सामना खेळवण्यात येईल. संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामान रंगेल.
अलूर क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांची वेळ
कर्नाट क्रिकेट असोसिएशनच्या अलूर क्रिकेट स्टेडियमवर सकाळी ९ वाजता मध्य प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यातील लढत पाहायला मिळेल. याच मैदानात दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रंगत पाहायला मिळेल.
सेमी फायनल अन् फायनल कधी?
या फेरीतून पुढे आलेले चार संघ १३ डिसेंबरला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर उतरत फायनलचा डाव साधण्यासाठी मैदानात उतरतील. सेमी फायनलची पहिली लढत दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. हा सामना संपल्यावर रात्री ८ वाजता दुसऱ्या सेमी फायनलची लढत रंगेल. १५ डिसेंबरला दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी फायनल सामना नियोजित आहे.
Web Title: SMAT 2024 Quarterfinals Schedule Syed Mushtaq Ali Trophy QF Schedule Venue Timings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.