SL vs IND : "माझे आणि त्याचे संबंध...", विराटबद्दल प्रश्न विचारताच गंभीर संतापला; संतप्त प्रतिक्रिया दिली

Gautam Gambhir press conference : प्रशिक्षक गौतम गंभीरने विविध बांबीवर भाष्य केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 11:13 IST2024-07-22T11:13:43+5:302024-07-22T11:13:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
sl vs ind series Gautam Gambhir press conference team india head coach speak on Virat Kohli | SL vs IND : "माझे आणि त्याचे संबंध...", विराटबद्दल प्रश्न विचारताच गंभीर संतापला; संतप्त प्रतिक्रिया दिली

SL vs IND : "माझे आणि त्याचे संबंध...", विराटबद्दल प्रश्न विचारताच गंभीर संतापला; संतप्त प्रतिक्रिया दिली

Press Conference BCCI : भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नेहमी चर्चेत असतात. आयपीएलमध्ये या दोघांमध्ये झालेला वाद आणि त्याच्या दुसऱ्या हंगामात पाहायला मिळालेल्या गळाभेटी... हे सर्वकाही क्रिकेट वर्तुळाचे लक्ष वेधत असते. खरे तर गंभीर आता नव्या भूमिकेत असून टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला आहे. २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळेल. ही मालिका नाना कारणांनी खास आहे. ट्वेंटी-२० मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल.

श्रीलंकेविरूद्धच्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर प्रकाश टाकला. विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर व्यक्त होताना गंभीरने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याचा रोख नेटकऱ्यांवर असल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि माझे खूप चांगले संबंध होते. पण, केवळ टीआरपीसाठी काहीही चालवले गेले. मी प्रशिक्षक झाल्यानंतर विराटसोबत चर्चा केली. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. आम्ही दोघे आमच्या संघासाठी सामने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करू, असे गौतम गंभीरने म्हटले. 

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा संघ -
वन डे 
- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा. 
ट्वेंटी-२० - सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

Web Title: sl vs ind series Gautam Gambhir press conference team india head coach speak on Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.