Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा, बॉलिवूड अभिनेत्याच्या नातेवाईकासह सहा जण अटकेत

भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामन्यावरील सट्ट्याप्रकरणी 6 जणांना क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे समजते. अमित अजित गिल असं त्याचं नाव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:59 IST

Open in App

मुंबई - भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामन्यावरील सट्ट्याप्रकरणी 6 जणांना क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे समजते. अमित अजित गिल असं त्याचं नाव आहे. गेल्याच आठवड्यात ठाणे आणि भांडुपमध्ये डझनभर बुकींना अटक करण्यात आली होती. त्याआधी गेल्या महिन्यात वांद्रे गुन्हे शाखेनं सहा सट्टेबाजांना जेरबंद केलं होतं.  त्यांच्याकडूनच पोलिसांना अमित गिलची लिंक मिळाली होती. तो एका अभिनेत्याचा मेव्हणा असल्याची माहिती पोलिसांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या दोन-तीन चित्रपटांमध्ये हा अभिनेता प्रमुख भूमिकेत असल्याचंही त्यांनी सूचित केलं. 

क्रिकेटमधील फिक्सिंग आणि बेटिंगचा विषय सध्या फारसा चर्चेत नाही. परंतु, बुकींच्या हालचालींवर मुंबई पोलिसांचं बारीक लक्ष आहे आणि सट्टेबाजांविरोधात कारवाईचं सत्रही महिनाभर सुरू आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच...)

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघभारतआॅस्ट्रेलिया