Ex-Pak Star Basit Ali On Shreyas Iyer's Asia Cup Snub : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवडीनंतर BCCI अन् निवडकर्ते नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. या स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरची निवड न झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारताचा माजी क्रिकेटर आर. अश्विनसह क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआय निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीये. त्यात आता श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्याच्या मुद्यावरून पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटरनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
घरात काय चालंय त्याचा मेळ लागेना, अन् पाक दिग्गज अय्यरचं नाव घेत टीम इंडियात डोकावला
टीम इंडियाआधी आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाली. PCB निवडकर्त्यांनी बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि नसीम शाह या स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. या मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातला सावळा गोंधळ बाजूला ठेवून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनं टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरसंदर्भात पेटलेल्या मुद्यावर आगीत तेल टाकायचं काम केलंय, असा काहीसा प्रकार पाहायला मिळतोय. कोण आहे तो पाकिस्तानचा क्रिकेटर अन् श्रेयस अय्यरसंदर्भात तो काय म्हणाला आहे? जाणून घेऊयात सविस्तर
श्रेयस अय्यर, सिराज अन् यशस्वी पाकिस्तानत असते तर...
'गेम टाइम शो'मध्ये कामरान अकमलसोबत गप्पा गोष्टी करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासिल अली म्हणाले की, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि यशस्वी सारखे खेळाडू पाकिस्तानमध्ये असते तर ते 'अ' श्रेणीत असते. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना श्रेयस अय्यरवर अन्याय झालाय. भारतीय संघात त्याची निवड व्हायला पाहिजे होती, असा उल्लेखही त्यांनी केलाय.
भारतीय खेळाडूंची नावे घेत PCB ला टोला?
आशिया कप स्पर्धेसाठी संघ निवड केल्यावर पाकिस्तानच्या संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादीही जाहीर केली होती. या यादीत अ श्रेणीत एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही. अय्यर, सिराज अन् यशस्वी यांची नावे घेत बाशित अली यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टोलाही मारल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते.
टीम इंडियाला फक्त हा संघ टक्कर देऊ शकतो; पाकचं नावही नाही घेतलं
यावेळी बासित अली यांनी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला कडवी टक्कर कोण देऊ शकतं, हेही सांगितले आहे. आपल्या संघाचं नाव न घेता टीम इंडियाला भिडण्याची ताकत फक्त श्रीलंकेच्या संघात आहे, असे मत या पाकिस्तानी क्रिकेटरनं व्यक्त केले आहे. श्रीलंकन संघ हा गत हंगामातील चॅम्पियन आहे.