Join us

एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याी संधी

IPL नंतर दोन आठवड्यांच्या आत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील आणखी एका संघाने फायनल गाठली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:30 IST

Open in App

Mumbai South Central Maratha Royals vs SoBo Mumbai Falcons, Final : श्रेयस अय्यरनं आयपीएल स्पर्धेत तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांना फायनलपर्यंत नेण्याचा अनोखा विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जच्या संघाला अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील आणखी एका संघाने फायनल गाठली आहे.  आयपीएल स्पर्धेत ट्रॉफी जिंकण्याची एक संधी गमावल्यावर  आता त्याच्याकडे दुसरी संधी चालून आली आहे. या संधीचं सोनं करून तो वानखेडेच्या मैदानावर ट्रॉफी उंचावणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL नंतर आता श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

आयपीएल स्पर्धा संपल्यावर श्रेयस अय्यर टी-२० मुंबई २०२५ स्पर्धेत सोबो मुंबई फाल्कन्स संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. हा संघ १२ जून रोजी मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स विरुद्ध फायनल खेळणार आहे. सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न अधुरे राहिल्यावर श्रेयस अय्यर या लीग स्पर्धेत संघाला ट्रॉफी जिंकून देत आपल्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड दमदार करण्याची संधी आहे. 

TNPL 2025 : बापरे! जोरदार फटका मारताच बॅटचे दोन तुकडे; बॉलर थोडक्यात वाचला (VIDEO)

अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा टी-२० मुंबई लीग स्पर्धेत धमाका 

टी २० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामातील स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील सोबो मुंबई फाल्कन्स संघाने दमदार कामगिरी करुन दाखवलीये. साखळी फेरीत ५ पैकी ४ सामन्यातील विजयासह संघाने आपला दबदबा दाखवून दिला. सेमी फायनलमध्ये नमो बांद्रा ब्लास्टर्सच्या संघाला ५ विकेट्सने पराभूत करत श्रेयस अय्यरच्या संघाने फायनलचं तिकीट पक्के केले आहे. 

फायनलमध्ये अय्यरसमोर सिद्धेश लाडचं चॅलेंज

मुंबई साउथ सेंट्रल रॉयल्सच्या संघाचे नेतृत्व हे सिद्धेश लाड याच्याकडे आहे. तो या स्पर्धेत कमालीची कामगिरी करताना दिसतोय. ६ सामन्यात त्याने सर्वाधिक ३ अर्धशतकासह २२७ धावा कुटल्या आहेत. श्रेयस अय्यरसमोर तो चॅलेंज निर्माण करू शकतो. सोबो मुंबई फाल्कन्सच्या संघाकडून श्रेयस अय्यरशिवाय आयपीएलमध्ये खास छाप सोडणारा अंगकृष्ण रघुवंशी देखील मैदानात उतरणार आहे. त्याच्याकडूनही संघाला मोठी अपेक्षा असेल.  

टॅग्स :श्रेयस अय्यरटी-20 क्रिकेट