आयपीएल स्पर्धेचा १८ वा हंगाम संपल्यावर देशातील वेगवेगळ्या राज्यात लोकल टी-२० लीग स्पर्धेचा थरार रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेताही गाजताना दिसतीये. या स्पर्धेत आर. अश्विनच्या रागाचा मुद्दा गाजत असताना त्यात आता एका व्हिडिओची भर पडलीये. या लीगमधील एका लढतीत फलंदाजाच्या हातातील बॅट तुटून ती गोलंदाजाला लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
फलंदाजाने मोठा फटका खेळला अन् बॅटचे झाले दोन तुकडे
९ जून रोजी कोइम्बतूरच्या मैदानात चेपॉक सुपर गिल्लीज विरुद्ध नेल्लई रॉयल किंग्ज यांच्यातील सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना घडली. सीएसजीच्या डावातील चौथ्या षटकात इमॅनुएल चेरियन गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर के आशिक नावाच्या बॅटरनं जोरदार फटका मारला. मिड-ऑफच्या दिशेनं फटका मारण्यासाठी त्याने परफेक्ट टायमिंगही साधले. पण जोराने बॅट फिरवल्यावर बॉलचा संपर्क होताच बॅटचे दोन तुकडे झाले.
बॅटचा तुटलेला भाग वेगाने बॉलरच्या दिशेनं आला, पण...
दांड्यासह एका बाजूला बॅटचा अर्धा भाग फलंदाजाच्या हाती अन् तुटलेला भाग गोलंदाजाच्या दिशेनं उडाला. हा तुकडा पायवर पडल्यामुळे गोलंदाजला किरकोळ दुखापत झाली. फळंदाजाच्या हाततील बॅटचा तुटलेला भाग अगदी वेगाने बॉलरच्या दिशेनं आला होता. पण सुदैवाने चेंडू टाकल्यावर गोलंदाज त्या दिशेनं वेगाने न जाता स्वत:वर नियंत्रण मिळवत थांबला. परिणामी मोठी इजा होण्यापासून तो बचावला.
मॅचचं काय झालं?
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या ६ व्या सामन्यात के आशिक याने ३८ चेंडूत १४२.११ च्या स्ट्राइक रेटनं १ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ५४ धावांची धमाकेदार खेळी केली. याशिवाय चेपॉक सुपर गिल्लीज कर्णधार अपराजित ४१ (२९), विजय शंकर ४७ (२४)* आणि सिंह याने ४५ (१४) धावांची खेळी केली. चेपॉक सुपर गिलीज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेल्लाई रॉयल किंग्जचा संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १७१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. चेपॉक सुपर गिलीजनं हा सामना ४१ धावांनी जिंकला.
Web Title: Tamil Nadu Premier League 2025 Chepauk Super Gillies Nellai Royal Kings Match Aashiq Bat Broke After Hit Shot Emmanuel Cherian Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.