बीसीसीआयने नव्या वर्षासाठीच्या मध्यवर्ती वार्षिक करारांची यादी प्रसिद्ध केली आहे. गतवर्षी करारामधून वगळलेल्या श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं झालेलं पुनरागमन हे या करारांचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं आहे. श्रेयस अय्यरला बी श्रेणीमध्ये तर ईशान किशन याला सी श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय या करारामध्ये अभिषेक शर्मासह काही युवा चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आलं आहे.
आज बीसीसीआयने २०२४-२५ वर्षांसाठी एकूण ३४ खेळाडूंना करारबद्ध केलं असून, त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना ए प्लस श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर के. एल. राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत यांना ए श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
तर सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल यांच्यासह श्रेयस अय्यरला बी श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय रिंकू सिंह तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांना क श्रेणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.