भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच भारतीय क्रिकेटर्ससोबतच्या केंद्रीय करारासंदर्भातील (Central Contract ) यादी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. नव्या वार्षिक करारात श्रेयस अय्यरची जागा जवळपास फिक्स मानली जात आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणारे आणि सध्याच्या घडीला करारबद्ध असलेल्या काही स्टार खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक कराराच्या यादीतून बाहेर काढू शकते. जाणून घेऊयात कोण आहेत ते रिस्क झोनमध्ये असणारे खेळाडू आणि त्यामागचं कारण
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीसीसीआय अय्यरसोबत वार्षिक करार करणार हे फिक्स
बीसीसीआयच्या आगामी वार्षिक करारात श्रेयस अय्यरच्या एन्ट्रीसोबत शार्दुल ठाकूरच्या नावाचा विचार होणार का? अन्य कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? करुण नायरचा विचार होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. श्रेयस अय्यरनं देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे गत वार्षिक करारातून पत्ता कट झाल्यावर यावेळी तो प्रमुख खेळाडूंपैकी एक असेल. त्याला उत्तम श्रेणीही मिळेल, अशी अपेक्षा आहे.
IPL कॅप्टनसह ४ खेळाडूंचा पत्ता होणार कट
वार्षिक करारातून वगळण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यंदाच्या हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व करणारा रजत पाटीदार, आवेश खान, केएस भरत या खेळाडूंना बीसीसीआय बाहेरचा रस्ता दाखवू शकते. या तिन्ही खेळाडूंना मागील वार्षिक करारावेळी 'क' श्रेणीत स्थान देण्यात आले होते. आरसीबीचा कर्णधार असला तरी बीसीसीआय त्याला वार्षिक करारात स्थान देईल, असे वाटत नाही. कारण इंग्लंड विरुद्धच्या टी-२० संघात त्याला संधी मिळाली नव्हती. आवेश खान याने २०२४ मध्ये ६ आंतरारष्ट्रीय टी-२० सामने खेळले. पण २०२३ पासून तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळेच त्याचा पत्ताही कट होण्याची शक्यता निर्माण झालीये. केएस भरत हा फेब्रुवारी २०२४ मध्ये अखेरचा आंतरारष्ट्रीय सामना खेळलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शार्दुल ठाकूरला टीम इंडियात संधी मिळेल, पण करारात त्याचे
या तिघांशिवाय शार्दुल ठाकूरही बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिसणं मुश्किल वाटते. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर तो टीम इंडियात एन्ट्री करेल, अशी शक्यता निर्माण झालीये. भारत विरुद्ध इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजेही कदाचित उघडले जाऊ शकतात. पण बीसीसीआयच्या वार्षिक करारात त्याच्या नावाचा समावेश होईल, असे वाटत नाही. कारण सातत्यपूर्ण संघासोबत राहिल अशाच खेळाडूंना वार्षिक करारात स्थान दिले जाते.