Shoaib Malik Sana Javed Divorce Sania Mirza : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक गेल्या काही वर्षांपासून त्याच्या खेळापेक्षा त्याच्या वादग्रस्त आयुष्यामुळे चर्चेत आहे. वादग्रस्त विधाने असोत किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळ असो, हा पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेकदा चुकीच्या कारणांमुळे अधिक चर्चेत राहिला आहे. गेल्या वर्षीच भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्याशी केलेले लग्न ११ वर्षांच्या संसारानंतर मोडल्यावर शोएब मलिकवर टीका झाली. त्यानंतर त्याने सना जावेद हिच्याशी तिसरा विवाह केला. पण आता त्याचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याच्या चर्चा आहेत.
सना जावेदशी २०२४मध्ये लग्न
जानेवारी २०२४मध्ये शोएब मलिक आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या घोषणेपूर्वीच शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या यायला सुरूवात झाली. त्याचवेळी शोएब मलिकने सोशल मीडियावर सना जावेद सोबतच्या लग्नाचा फोटो पोस्ट करून चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर, सानियाच्या कुटुंबाने काही काळापूर्वीच सानिया-शोएबचा खुल्ला (घटस्फोट) झाल्याचे सांगितले. शोएबच्या बहिणीनेही धक्कादायक खुलासा केला की, शोएब मलिकच्या वारंवार होणाऱ्या अफेअर्समुळेच सानिया नाराज होती. तशातच आता शोएबचे तिसरे लग्नही मोडते की काय, अशी चर्चा आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये सना-शोएबमध्ये तणाव
सानियाशी घटस्फोट घेतल्यानंतर शोएबने सना जावेदशी लग्न केले. हे त्याचे तिसरे लग्न आहे. पण आता त्यांचेही लग्न तुटणार असल्याची चर्चा दीड वर्षात सुरू झाली आहे. सोशल मीडियावर अलिकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शोएब मलिक आणि सना जावेद एका कार्यक्रमात एकत्र बसलेले दिसत आहेत. पण ते एकमेकांशी बोलतही नाहीत किंवा हावभाव करतानाही दिसत नाहीत. शोएब चाहत्यांना ऑटोग्राफ देतोय. तर सना दुसऱ्या बाजूला तोंड करून बसलेली दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसत असल्याचे बोलले जात आहे. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून, शोएब मलिक आणि सना जावेद यांचे नातेही तुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा किंवा अधिकृत माहिती मिळालेली नाही. शोएब मलिकचा पहिला निकाह आयेशा सईद हिच्याशी झाला होता, तो आठ वर्षांनी मोडला. त्यानंतर सानिया आणि शोएबने २०१० मध्ये लग्न केले, परंतु २०२४मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता सना ही शोएबची तिसरी पत्नी आहे. तसेच, सनाचेही हे दुसरे लग्न आहे. तिने मलिकशी लग्न करण्यापूर्वी तिचे आधीचे नाते संपवले होते.