Shashi Tharoor On Vaibhav Suryavanshi : बीसीसीआयच्या देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने १९० धावांच्या धमाकेदार खेळीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले. त्याच्या या दमदार खेळीनंतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी या युवा फलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळायला हवे, असे मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट बीसीसीआयसह निवडसमितीचे प्रमुख अजित आगरकर आणि टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला खास विनंती केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीची सचिनशी तुलना! आता वाट न पाहता टीम इंडियात घ्या!
काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीमध्ये सचिनसारखी प्रतिभा दिसून येते, असे म्हटले आहे. त्यांनी अधिकृत एक्स अकाउंटवरुन वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात घेण्यासंदर्भात खास पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, "याआधी सचिन तेंडुलकरनं वयाच्या १४ व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात प्रतिभा दाखवून दिली होती. कमी वयात संधी मिळाल्यावर त्याने पुढे काय केलं ते आपण सर्वांनी पाहिले आहे. आता वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून खेळवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपण कशाची वाट पाहत आहोत?" हे ट्विटमध्ये त्यांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर बीसीसीआय, आणि बीसीसआय वरिष्ठ पुरुष निवड समिती प्रमुख अजीत आगरकर यांच्यासह सचिन तेंडुलकरला टॅग केले आहे.
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला वैभव
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात विक्रमी खेळी साकारली होती. १९० धावांच्या खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. या खेळीसह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाजही ठरला. डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या ३६ चेंडूत शतक साजरे केले.
एबी डीव्हिलियर्सचा रेकॉर्ड मोडला
वैभव सूर्यवंशी याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ८४ चेंडूत १६ चौका आणि १५ षटकारांच्या मदतीने १९० धावांची खेळी केली. दरम्यान त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रमही मोडला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद दिडशे धावा करण्याचा विक्रम हा याआधी एबीच्या नावे होता. त्याने ६४ चेंडूत या धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीनं ५९ चेंडूत दिडशेचा पल्ला गाठत नवा विक्रम प्रस्थापित केला.