Join us

आशिया कप स्पर्धेआधी शाहीन शाह आफ्रिदीनं साधला मोठा डाव; जगात भारी असलेल्या बुमराहला केलं ओव्हरटेक

पाकसमोर राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघ १४३ धावांत ऑल आउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:10 IST

Open in App

Shaheen Afridi Surpassed Jasprit Bumrah : आशिया कप स्पर्धेआधी युएईच्या मैदानात यमजान UAE सह पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील संघात टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ३९ धावांनी विजय नोंदवत मालिकेची सुरुवात धमाकेदार केलीये. या सामन्यात पाकचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनं २ विकेट्स घेत मोठा डाव साधला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आता जसप्रीत बुमराहच्या पुढे निघून गेलाय. या कामगिरीमुळे तो लक्षवेधी ठरताना दिसतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!जसप्रीत बुमराह जगात भारी, पण टी-२० मध्ये पाकिस्तान गड्यानं त्याला मागे टाकलं

जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. भारतीय गोलंदाजाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खास छाप सोडलीये. पण टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आता पाकच्या शाहीन शाह आफ्रिदीनं त्याला मागे टाकले आहे. २२५ टी-२० सामन्यातील २२४ डावात शाहिन शाह आफ्रिदीनं ३१४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. बुमराह आफ्रिदीपेक्षा अधिक सामने खेळलाय. पण विकेट मिळवण्याच्या बाबतीत तो मागे पडल्याचे पाहायला मिळते. २४५ टी-२० सामन्यात सामन्यात जसप्रीत बुमराहच्या खात्यात ३१३ विकेट्सची नोंद आहे.

VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...

राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघ १४३ धावांत ऑल आउट

तिरंगी टी-२० मालिकेतील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार सलमना अली आगाच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तान संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या हो्त्या. या धावांचा पाठलाग करताना राशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघ १९.५ चेंडूत १४३ धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून हॅरिस राउफ याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय शाहीन शाह आफ्रिदीसह मोहम्मद नवाझ आणि सुफियान मुकिम या गोलंदाजांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

टॅग्स :टी-20 क्रिकेटएशिया कप 2023पाकिस्तानअफगाणिस्तानजसप्रित बुमराह