Join us  

शाहरुख खाननं दिलेला शब्द पाळला नाही; सौरव गांगुलीचा KKRवर गंभीर आरोप

गांगुलीनं 2008 आणि 2010मध्ये KKR संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:00 PM

Open in App

भारताचा आणि कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं शुक्रवारी मोठा गौप्यस्फोट केला. KKR संघाची सूत्र हाती घेताना निर्णय घेण्यासाठी सर्व मोकळीक दिली जाईल, असे वचन दिलं गेलं होतं, परंतु तसं घडलंच नाही, असा दावा गांगुलीनं केला. गांगुलीनं 2008 आणि 2010मध्ये KKR संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. आयपीएलच्या पहिल्या हंगामात निराशाजनक कामगिरीनंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं.

2010मध्ये संघानं मुख्य प्रशिक्षकपदी डेव्ह वॉटमोर यांची निवड केली आणि गांगुलीला पुन्हा कर्णधारपद दिलं गेलं. एका यू ट्यूब चॅनलवर बोलताना गांगुली म्हणाला,''IPLच्या चौथ्या वर्षी शाहरुख खाननं गौतम गंभीरला सांगितले की हा तुझा संघ आहे, मी हस्तक्षेप करणार नाही, असे मी एक मुलाखतीत पाहिले. मी पहिल्या वर्षी हेच शाहरुखला सांगितले होते, माझ्यावर सोड. पण तसे झाले नाही. तेव्हा सर्वोत्तम खेळाडू आमच्याकडे होते. चेन्नई सुपर किंग्सकडे पाहा, मुंबई इंडियन्सकडे पाहा. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांना हा खेळाडू निवड असे कोणी सांगत नाही.''  

पाहा व्हिडीओ...

पहिल्या तीन मोसमात निराशाजनक कामगिरीनंतर KKRनं गांगुलीला रिलीज केलं. त्यानंतर 11.04 कोटींत संघानं गौतम गंभीरला घेतलं आणि पुढील सात मोसम तो कर्णधार होता. पुढील मोसमात त्यानं संघाला जेतेपद जिंकून दिलं आणि दोन वर्षानंतर आणखी एक जेतेपद पटकावलं. 2018मध्ये संघांन गंभीरला रिलीज केलं आणि आता 7.4 कोटीत दिनेश कार्तिकला संघानं करारबद्ध केलं आणि त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली KKRनं 27पैकी 13 सामने जिंकले, तर गंभीरच्या नेतृत्वाखाली 69सामन्यांत विजय मिळवले. कार्तिकनं 30पैकी 15 सामन्यांत विजय मिळवून दिले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!

 

टॅग्स :सौरभ गांगुलीकोलकाता नाईट रायडर्सशाहरुख खान