‘Everyone was involved in the scheme to drop me’, Sourav Gangly recalls his sacking as captain and player in 2005 | मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!

मला संघाबाहेर करण्यासाठी ग्रेग चॅपल यांना अनेकांनी मदत केली; सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट!

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यात खटके उडाल्याचे प्रसंग चर्चिले जातात. त्यांनी गांगुलीला आधी कर्णधारपदावरून दूर केले आणि नंतर संघातूनच बाहेर केले. 2005मध्ये कर्णधारपदावरून काढल्यानं  कारकिर्दीला मोठा धक्का बसल्याचे गांगुलीनं मान्य केलं. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं परदेशात विजय मिळवण्यास सुरुवात केली होती. त्याशिवाय 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. पण, चॅपल मुख्य प्रशिक्षकपदी आले आणि सर्व काही बदललं. त्यांनी गांगुलीविरोधात बीसीसीआयला पाठवलेला मेल मीडियात लिक झाला होता. त्यामुळेच संघाबाहेर करण्यासाठी चॅपल यांना अनेकांनी मदत केल्याचे गांगुलीला वाटते.

सुनील गावस्कर यांना सलाम; उचलला 35 लहान मुलांच्या ऑपरेशनचा खर्च

तो म्हणाला,''क्रिकेट संघ एका कुटुंबाप्रमाणे असतो आणि कुटुंबातील वाद जगासमोर नेण्यापूर्वी ते सोडवता आले असते. मला चॅपल यांना एकट्याला दोषी ठरवायचे नाही. त्यांनी याची सुरुवात केली, यात वादच नाही. त्यांनी माझ्याविरोधात बीसीसीआयला मेल केला आणि तो लिक झाला. हे असंच घडू शकत नाही ना?''

''मतमतांतर होती, कुटुंबात गैरसमज होते, परंतु चर्चा करून ते सोडवता आले असते. तुम्ही प्रशिक्षक होता आणि जर तुम्हाला माझ्या खेळात काही सुधारणा हवी होती, तर तसं मला सांगायला हवं होतं. मी खेळाडू म्हणून आलो तेव्हा मला सांगण्यात आलं, तर मग आधी का नाही सांगितलं?,''असा सवालही गांगुलीनं केला. तो पुढे म्हणाला,''याचा अर्थ दुसरे निर्दोष आहेत असं नाही. त्यांना पाठींबा देणारी यंत्रणा होती. त्यामुळे मला संघाबाहेर करण्यात प्रत्येकाचा हात आहे. तरीही मी खचलो नाही आणि स्वतःवरील विश्वास गमावला नाही.'' बंगाली वृत्तपत्र Sangbad Pratidin शी बोलताना गांगुलीनं हा गौप्यस्फोट केला.  

झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतल्यनंतर कर्णधारपदावरून हटवलं आणि नंतर संघाबाहेरच केले.''माझ्या कारकिर्दीला हा मोठा धक्का होता. माझ्यावर अन्याय झाला. तुम्हाला प्रत्येकवेळी न्याय मिळेल, असं नाही, परंतु त्यानंतर दिलेली वागणूक टाळता आली असती. झिम्बाब्वे दौऱ्यावर माझ्या नेतृत्वाखाली विजय मिळवून संघ परतला होता आणि मायदेशात परतल्यानंतर मला काढण्यात आले का?,''असे गांगुली म्हणाला.  

''2007मध्ये देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. 2003मध्ये आम्ही अंतिम फेरीत पराभूत झालो होतो. त्यामुळे मला स्वप्न पाहण्याचा हक्क होता. माझ्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. देशात आणि परदेशातही. तरीही मला अचानक वगळण्यात आलं? वन डे संघात मी फिट बसत नाही, असे मला सांगितले आणि नंतर कसोटी संघातूनही बाहेर केले,''असेही गांगुली म्हणाला.  

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

टीम इंडियातील दोन खेळाडूंमध्ये झालेला वाद; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Everyone was involved in the scheme to drop me’, Sourav Gangly recalls his sacking as captain and player in 2005

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.