Michael Holding fights back tears while talking about the racism faced by his parents | Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू मायकेल होल्डींग यांनी इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वर्णद्वेषावरून सडेतोड मत मांडले होते. कोरोना व्हायरसच्या संकटात 117 दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले होते. अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा चर्चिला गेला. क्रीडा विश्वातून या घटनेचा निषेध करण्यात आला. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाला विरोध केला. होल्डींग यांच्या कटुंबीयांनाही या संकटाचा सामना करावा लागला होता आणि त्याबद्दल सांगतात कॅमेरासमोर ढसाढसा रडले.

कसोटीच्या पहिल्या दिवशी होल्डींग यांनी वर्णद्वेष संपवण्यासाठी लोकांना शिक्षण देण्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. वर्षानुवर्षे कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार थांबायला हवे. गुरुवारी होल्डींग यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्या दरम्यान ते रडले. त्याच्या पालकांचा रंग काळा होता, म्हणून त्यांना समाजानं दिलेली वागणूक आठवून होल्डींग यांच्या डोळ्यात अश्रु आले.
ते म्हणाले,''माझ्या कुटुंबीयांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. माझे वडील काळे होते, म्हणून माझ्या आईच्या कुटुंबीयांनी तिच्याशी बोलणं सोडलं होतं. त्यावेळी ते कोणत्या परिस्थितीतून गेले, याची मला जाण आहे.''

पाहा व्हिडीओ...


गॅब्रियल, होल्डरचा दणका, विंडीजविरुद्ध इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावात संपुष्टात
साऊथम्पटन : शॅनन गॅब्रियल (४-६२) आणि कर्णधार जेसन होल्डर (६-४२) यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुस-या दिवशी गुरुवारी गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव चहापानापर्यंत २०४ धावात गुंडाळला . तळाचा डॉमनिक बेस (नाबाद ३१) आणि जेम्स अँडरसन (१०) यांनी अखेरच्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी केल्यामुळे इंग्लंडला दोनशेचा पल्ला ओलांडता आला. 

पहिल्या दिवशी १७.४ षटकात १ बाद ३५ धावा करणा-या इंग्लंडने आपले नवोदित फलंदाज लवकर गमावले. गॅब्रियलने भेदक मारा सुरु ठेवत ज्यो डेन्ली आणि रोरी बर्न्स यांना बाद केले. बर्न्सने आजच कसोटी क्रिकेटमध्ये हजार  धावा पूर्ण केल्या. लागोपाठ बसलेल्या धक्क्याने इंग्लंड बॅकफूटवर गेला. यानंतर जॅक क्रॉले आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. तथापि जेसन होल्डरने क्रॉले आणि पोप यांना पाठोपाठ बाद करून इंग्लंडला पुन्हा एकदा तडाखा दिला. ५ बाद ८७ अशा बिकट अवस्थेतून बाहेर  काढण्यासाठी कर्णधार स्टोक्स आणि अनुभवी बटलर यांनी खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. इंग्ल्डच्या डावात स्टोक्स (४३), जोस बटलर (३५) व बेस (३१) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Michael Holding fights back tears while talking about the racism faced by his parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.