Join us  

रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास

अल्पसंख्याक आयोगाकडे युवकाची धाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 1:36 PM

Open in App

भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत याचे कुटुंबीय सध्या चर्चेत आहेत. पंतची आई आणि बहीण यांच्यावर त्यांच्याच हॉटेलवर काम करणाऱ्या एका कुकने गंभीर आरोप केले आहेत. त्यानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पंतच्या कुटुंबीयाचे दिल्ली-हरिद्वार हाय वे नजीक 'बेक टू बेस' नावाचं रेस्टॉरंट आहे. तेथे हा कुक काम करायचा.

Big News : IPL 2020 भारताबाहेर होणार? BCCI करतेय विचार

अमर उजाला या हिंदी वेबसाईटनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यांच्या वृत्तानुसार फैज आलम नावाच्या युवकाने पंतची आई आणि बहिणीवर आरोप केले आहेत. पंतची आई आणि बहिणीनं दोन महिन्याचा पगार दिला नसून त्याबाबत विचारल्यावर त्या दोघींनी धमकी दिल्याचा आरोप युवकानं केला आहे. फैजनं अल्पसंख्यांक आयोगाकडे 30 मार्च 2020मध्ये तक्रारीचं पत्र दाखल केलं आहे. पंतची बहिण साक्षी पंत हे रेस्टॉरंट चालवते आणि डिसेंबर महिन्यापासून फैज तेथे काम करत होता.

त्याला 9500 इतका पगार देण्याचे ठरले होते. पण, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पगार न दिल्याची तक्रार फैजने दाखल केली. पाच मार्चला हॉटेल बंद झाल्याचे सांगून त्याला कामावर येऊ नको असे सांगण्यात आले. तेव्हा फैजने दोन महिन्यांचा पगार मागितला, तेव्हा पंतच्या आईनं त्याला धमकी दिली. फैजने सांगितले की,''पंतची आई सरोज  यांनी मला धमकावले की, माझा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. त्याला सर्व अधिकारी ओळखतात. पुन्हा पैसे मागितलेस, तर पोलिसांच्या स्वाधीन करेन.''

फैजने सांगितले की,''मी आता बेरोजगार झालो आहे. माझे वडील नाहीत आणि दोन बहिणी व आई या सर्वांचा मलाच सांभाळ करावा लागतो. माझी परिस्थिती सध्या बिघडली आहे.'' या संबंधात पोलीस अधिकारी चंदन सिंग बिस्त यांनी सांगितले की,''एसएसपी कार्यालयातून आम्हाला प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.''

मनुष्य भरवशाच्या लायकीचा नाही; गर्भवती हत्तीणीच्या हत्येवर भारताचे कुस्तीपटू भडकले 

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

टॅग्स :रिषभ पंतगुन्हेगारी