Scotland vs Italy ICC Men's T20 World Cup 2026 Live Streaming Info : फुटबॉलमधील महासत्ता इटलीचा संघ आता क्रिकेटच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज आहे. कोलकात्यातच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातून आयर्लंडविरुद्धच्या लढतीनं इटलीचा संघ यंदाच्या टी२० वर्ल्ड कपच्या आपल्या ऐतिहासिक मोहिमेली सुरुवात करणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एतिहासिक सामना अन् कमालीचं ट्विस्ट!
चार वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणारा इटलीच्या संघाने युरोपियन प्रादेशिक पात्रता फेरीतून विस्तारित २० संघांच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली होती. ज्या संघाला पात्रता फेरीतून बाद केलं त्याच स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात इटलीचा संघ ऐतिहासिक सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. स्काटलंडचा संघाला शेवटच्या क्षणी नशीबाची साथ मिळाली आणि बांगलादेशचा संघ ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडल्यावर त्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.
T20 World Cup: "आता Ind vs Pak सामना खेळला जाऊ शकतो..."; पाकिस्तानातून कुणी केला मोठा दावा?
ट्रिपल हेडरमधील अन्य लढती कधी अन् कुठे खेळवण्यात येणार
इटली आणि स्कॉटलंडशिवाय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 'ब' गटातील झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यात स्पर्धेतील आठवा सामना खेळवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता कोलंबोच्या मैदानात हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. सायंकाळी ७ वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामना अहमदाबादच्या मैदानात खेळण्यात येईल.
भारतात थेट सामना कुठे पाहता येईल?
स्कॉटलंड विरुद्ध इटली यांच्यातील आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय हा सामना भारतात जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर थेट पाहता येईल.
स्कॉटलंड संघ :
रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस ग्रेव्ह्स, झैनुल्लाह इहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीक, फिनले मॅक्रीथ, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मन्सी, सफयान शरीफ, मार्क वॉट, ब्रॅडली व्हीलप्रवासासाठी राखीव खेळाडू: जॅस्पर डेव्हिडसन, जॅक जार्विस
इटलीचा संघ
वेन मॅडसन (कर्णधार), मार्कस कॅम्पोपियानो, जियान पिएरो मीड, झैन अली, अली हसन, क्रिशन जॉर्ज कालुगामगे, हॅरी मॅनेन्टी, अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, सैयद नक्वी, बेंजामिन मॅनेन्टी, जसप्रीत सिंग, जेजे स्मट्स, ग्रँट स्टुअर्ट, थॉमस ड्राका
Web Summary : Italy joins T20 World Cup, facing Ireland after qualifying through Europe. Scotland got lucky after Bangladesh's exit. Watch Scotland vs Italy on Star Sports and JioHotstar in India.
Web Summary : इटली टी20 विश्व कप में शामिल, यूरोप के माध्यम से क्वालीफाई करने के बाद आयरलैंड का सामना। बांग्लादेश के बाहर होने के बाद स्कॉटलैंड भाग्यशाली रहा। भारत में स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर स्कॉटलैंड बनाम इटली देखें।