Join us

IND vs AUS: "मारने का मूड ही नहीं हो रहा है यार", सूर्याचा आवाज स्टंपच्या माईकमध्ये कैद, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 14:26 IST

Open in App

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. सध्या या स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत. आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना पार पडला, ज्यामध्ये भारतीय संघाने 6 धावांनी विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने कांगारूच्या गोलंदाजांना घाम फोडताना आजचा सराव सामना चांगलाच गाजवला. त्याने 33 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. सूर्या बाद होण्याआधी त्याच्या तोंडून निघालेली एक कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्यकुमार यादव शेवटच्या षटकात सावध फटकार खेळताना दिसला. यावर तो थोडा नाराजही होता.

दरम्यान,"मारने का मूड ही नहीं हो रहा है यार", असे सूर्यकुमार यादव बोलला जे स्टंपच्या माईकमध्ये कैद झाले. असे बोलताच दुसऱ्या चेंडूवर त्याने स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चुकीचा फ्लिक शॉट मारला आणि तो बाद झाला. त्याने मारलेला फटकार थेट वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनच्या हातात गेला आणि सूर्या बाद झाला. 

भारतीय संघाची विजयी सलामी सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ब्रिस्बेन स्टेडियमवर सामना खेळवला गेला. भारतीय संघाने शानदार खेळी करून कांगारूच्या संघावर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर भुवनेश्वर कुमार (2), अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, आणि युजवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 186 धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला 20 षटकांत सर्वबाद 180 धावा करण्यात यश आले. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी केली होती. यांच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (15), विराट कोहली (19) आणि दिनेश कार्तिक (20) धावा करून बाद झाला. 

आगामी सराव सामने खालीलप्रमाणे 

17 ऑक्टोंबर -भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियान्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका इंग्लंड विरूद्ध पाकिस्तानअफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश 

19 ऑक्टोंबर -अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका भारत विरूद्ध न्यूझीलंड

टी-20 विश्वचषकात सुपर-12 पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील. 

पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.

ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे. 

सुपर-12 फेरीगट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.

गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App