T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत

जिथं संजू फ्लॉप ठरला तिथं ईशान किशनने शानदार शो दाखवला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:31 IST2026-02-04T19:27:13+5:302026-02-04T19:31:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sanju Samson snubbed, India experiment Ishan Kishan-Abhishek Sharma opening pair right before T20 World Cup | T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत

T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत

Ishan Kishan-Abhishek Sharma Team India New Opening Pair Right Before T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नव्या सलामी जोडीसह सरावाला पसंती दिली. नाणेफेकीनंत सूर्यकुमार यादवनं अभिषेक शर्माच्या साथीनं ईशान किशन भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल, हे स्पष्ट केले. सराव सामन्यातील हे चित्र पहिल्या पसंतीचा सलामीचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमधील पत्ता जवळपास कट झाला आहे, याचे संकेत देणाराच आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जिथं संजू फ्लॉप ठरला तिथं ईशान किशनने शानदार शो दाखवला अन्...

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला होता. दुसऱ्या बाजूला जवळपास दोन वर्षांनी थेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दुसऱ्या विकेट किपर बॅटरच्या रुपात टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या ईशान किशन याने खास छाप सोडली. एका बाजूला संजूचा फ्लॉप शो सुरु असताना त्याने शानदार खेळीसह सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती असल्याचा दावा ठोकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात टीम इंडियानेही त्यालाच सलामीला पाठवण्याला संधी देत आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांसह डावाची सुरुवात करण्याचा पॅटर्न आजमावणार असल्याची हिंटच दिली आहे. 

T20 World Cup 2026: टीम इंडिया खतरनाकच! पण कधी कधी… MS धोनीने ‘या’ गोष्टीबद्दल व्यक्त केली चिंता

  "दो भाई, दोनों तबाही"... हाच असेल टीम इंडियाचा नवा पॅटर्न 

अभिषेक शर्मा हा तुफान फटकेबाजीसह डावाची सुरुवात करण्यात माहिर आहे. ईशान किशन हा देखील त्याच धाटणीत खेळतो. ही जोडी IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळताना दिसते. त्यामुळे त्यांच्यात कमालीचा ताळमेळही आहे. सराव सामन्यातील हाच प्रयोग टीम इंडियाने मुख्य सामन्यासाठीही आजमावला तर टीम इंडियाचा   "दो भाई, दोनों तबाही" पॅटर्न भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडणारा ठरू शकतो.  जर लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनचा विचार झाला नाही तर संजू सलामीवीराच्या  रुपात मागे पडू शकतो. एवढेच नाही तर या परिस्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणंही मुश्कील होईल.  

ईशान किशनची सरप्राइज एन्ट्री अन्...

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून कमबॅक करण्याआधी  २०२३ मध्ये ईशान किशन टीम इंडियाकडून अखेरचा आंतरारष्ट्रीय सामना खेळला होता. तो वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग असेल, याचा विचारही कुणी केला नव्हता. पण देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने आपल्यातील धमक दाखवली अन् थेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याची टीम इंडियात एन्ट्री झाली. या संधीचं तो सोनं करताना पाहायला मिळत असून टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवण्यासाठी तो सज्ज आहे.

 

Web Title : टी20 विश्व कप 2026: भारत किशन, शर्मा के साथ विस्फोटक शुरुआत करने की तैयारी में।

Web Summary : टीम इंडिया टी20 विश्व कप 2026 के लिए ईशान किशन और अभिषेक शर्मा की नई सलामी जोड़ी तलाश रही है। उनकी विस्फोटक बाएं हाथ की बल्लेबाजी शैली गेंदबाजों को चुनौती दे सकती है, जिससे संजू सैमसन को बाहर बैठना पड़ सकता है। किशन की वापसी रोमांचक है।

Web Title : T20 World Cup 2026: India eyes explosive opening with Kishan, Sharma.

Web Summary : Team India explores a new opening pair of Ishan Kishan and Abhishek Sharma for the T20 World Cup 2026. Their explosive left-handed batting style could challenge bowlers, potentially sidelining Sanju Samson. Kishan's comeback adds excitement.