भारतीय संघातील विकेट किपर बॅटर संजू सॅमसन याने यंदाच्या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या भात्यातील धमक दाखवून दिली आहे. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी केली. पण शुबमन गिल संघात परतला अन् संजू सॅमसनवर पुन्हा एकदा संघात असून नसल्यासारखी वेळ आली. आशिया कप स्पर्धेतील सामन्यात कधी तिसऱ्या, कधी पाचव्या तर एका सामन्यात तर बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याला आठव्या क्रमांकावर ढकलण्यात आले. टीम इंडियात पुन्हा संजू सॅमसनवर अन्याय सुरु झाल्याची चर्चाही रंगली. स्पोर्ट्स अँकर मयंतीनं हाच कळीचा मुद्दा छेडत संजू सॅमसनच्या मनात काय सुरुये ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संजूनंही एकदम कडक रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले. नेमकं तो काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मयंतीच्या 'बोलंदाजीवर' संजू सॅमसनची फटकेबाजी
CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात संजू सॅमसन याला यंदाच्या वर्षातील आंतरारष्ट्रीय टी-२० मधील सर्वोत्तम फलंदाजाच्या रुपात पुरस्कार मिळाला. त्यानंतर मयंती लँगर हिने संजूची खास मुलाखत घेतली. यावेळी तिने बॅटिंग ऑर्डरमध्ये त्याच्यासोबत जो खेळ सुरुये त्यावर प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना संजून कारकिर्द कधी सुरु झाली अन् किती सामने खेळले हे सांगत आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली.
मी काहीही करायला तयार, नेमकं काय म्हणाला संजू?
टीम इंडियात आपल्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सुरु असलेल्या प्रयोगासंदर्भातील प्रश्नावर संजू म्हणाला की, मी नवव्या क्रमांकावर खेळायलाही तयार आहे. जर मला डाव्या हाताने गोलंदाजी करायला लावली तर मी तेही करेन. टीम इंडियाची जर्सी घातल्यावर नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून सकारात्कमतेसह येईल ती जबाबदारी पार पाडण्यास कोणताही अडचण वाटत नाही, असे म्हणत ओपनिंगचा स्लॉट गेला असला तरी संघातील स्थान टिकवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, अशा आशयाच्या वक्तव्य त्याने केले आहे.
१० वर्षांत फक्त ४० सामने
संजू सॅमसन याने यावेळी कारकिर्दीतील खास टप्पा पार केल्याची गोष्ट सांगून या काळात किती संधी मिळाल्या या गोष्टीवरही भाष्य केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतीच १० वर्षे पूर्ण केली. मी फक्त ४० सामने खेळलो आहे. आकड्यांपेक्षा टीम इंडियाकडून खेळायला मिळाल, हे माझ्यासाठी अभिमानस्पद वाटते, असे म्हणत जे काही सुरुये त्यावर वादग्रस्त गोष्टी न आणता संघात मिळेल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याची गोष्ट त्याने बोलून दाखवली आहे. कोणतीही जबाबदारी द्या, पण संघात घ्या, अशी भावना व्यक्त करत त्याने कोच गौतम गंभीर अँण्ड टीम मॅनेजमेंटला सकारात्मकरित्या संघासोबत राहिन, अशी हमीच जणून दिलीये.