Sanju Samson : संजूचं शतक थोडक्यात हुकलं; पण स्फोटक खेळीसह कोहलीसह 'या' दिग्गजांची केली बरोबरी

सलग तीन अर्धशतकासह खास विक्रमाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 21:45 IST2026-03-08T21:44:38+5:302026-03-08T21:45:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sanju Samson Miss Century But Creates History Becomes 2nd Indian To Slam 3 Back-To-Back 50s In T20 World Cup After Virat Kohli | Sanju Samson : संजूचं शतक थोडक्यात हुकलं; पण स्फोटक खेळीसह कोहलीसह 'या' दिग्गजांची केली बरोबरी

Sanju Samson : संजूचं शतक थोडक्यात हुकलं; पण स्फोटक खेळीसह कोहलीसह 'या' दिग्गजांची केली बरोबरी

टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसन याचे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये शतक पुन्हा एकदा अवघ्या ११ धावांनी हुकलं. पण सलग तिसऱ्या अर्धशतकासह त्याने मोठा डाव साधला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संजूनं ४८ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले, पण या खेळीत त्याने खास डाव साधला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सलग तीन अर्धशतकासह खास विक्रमाला गवसणी

१ मार्च रोजी कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी करत टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यानंतर ५ मार्चला मुंबईत इंग्लंडविरुद्ध त्याने ४२ चेंडूत ८९ धावांची खेळी साकारली. कामगिरीतील सातत्य कायम ठेवत त्याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरही अर्धशतक झळकावले. ३३ चेंडूत शतक झळकावताना त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये अर्धशतकी खेळी करणारा संजू हा तिसरा बॅटर ठरला. पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीनं २००९ च्या हंगामात अशी कामगिरी करून दाखवली होती. याशिवाय विराट कोहलीनं २०१४ च्या हंगामात हा पराक्रम केला होता.

IND vs NZ : "दो भाई दोनों तबाही..." संजूसह अभिषेकचा धमाका! पॉवरप्लेमध्ये विक्रमी भागीदारीचा रेकॉर्ड

केएल राहुलनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय विकेट किपर बॅटर
  
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो सलग तीन अर्धशतके झळकवणारा तो लोकेश राहुल (KL Rahul) नंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. लोकेश राहुलनं २०२१ च्या टी-२० वर्ल्ड दरम्यान सलग तीन अर्धशतके केली होती. त्याने ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध ६९ धावा, ५ नोव्हेंबरला स्कॉटलंडविरुद्ध ५० धावा आणि ८ नोव्हेंबरला नामिबियाविरुद्ध नाबाद ५४ धावांची खेळी साकारली होती.

विराट कोहलीसह या दिग्गजांच्या पंक्तीत एन्ट्री

संजू सॅमसन याने या अर्धशतकी खेळीसह विराट कोहलीच्याही खास क्लबमध्ये एन्ट्री मारली. विराट कोहलीनं दोन वेगवेगळ्या हंगामात सलद तीन वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. २०१६ च्या हंगामत त्याने मोहालीच्या मैदानात नाबाद ८२ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत नाबाद ८९  धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०२१ च्या हंगामात पाकिस्तानविरुद्ध कोहलीनं ५७ धावांची खेळी केली होती.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग ३ अर्धशतके झळकवणारे फलंदाज

  • महेला जयवर्धने (२०१०)
  • विराट कोहली (२०१६-२०२१)
  • बाबर आझम (२०२१)
  • केएल राहुल (२०२१)
  • कुसल मेंडिस (२०२६)
  • साहिबजादा फरहान (२०२६)
  •  संजू सॅमसन (२०२६)

Web Title : संजू सैमसन का शतक चूका, पर कोहली के साथ विस्फोटक पारी की बराबरी

Web Summary : संजू सैमसन न्यूजीलैंड के खिलाफ 89 रनों की विस्फोटक पारी से विराट कोहली के बराबर पहुंचे। टी20 विश्व कप में लगातार तीन अर्धशतक बनाए, केएल राहुल के बाद यह उपलब्धि हासिल करने वाले दूसरे भारतीय विकेटकीपर बने।

Web Title : Sanju Samson misses century, equals Kohli with explosive innings.

Web Summary : Sanju Samson's explosive 89 against New Zealand puts him alongside Virat Kohli, achieving three consecutive half-centuries in T20 World Cup, matching KL Rahul's record as second Indian wicket-keeper to achieve this feat.