Asia Cup 2025 : संजूच्या टप्पात आहे MS धोनीसह रैना अन् धवनचा रेकॉर्ड, पण...

उत्तुंग फटकेबाजीसह  षटकार किंगच्या यादीतील रँकिंग सुधारण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 20:25 IST2025-09-08T20:17:08+5:302025-09-08T20:25:55+5:30

whatsapp join usJoin us
Sanju Samson Chance To Surpass MS Dhoni Suresh Raina Shikhar Dhawan Most Sixes For India In T20I Asia Cup 2025 | Asia Cup 2025 : संजूच्या टप्पात आहे MS धोनीसह रैना अन् धवनचा रेकॉर्ड, पण...

Asia Cup 2025 : संजूच्या टप्पात आहे MS धोनीसह रैना अन् धवनचा रेकॉर्ड, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sanju Samson Eyes On Recod : भारतीय विकेट किपर बॅटर संजू सॅमसन हा टी-२० क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी करताना दिसतोय. आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत त्याला आशिया कप स्पर्धेत मोठा डाव साधण्याची संधी आहे. जर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले अन् सलामीच्या बॅटरच्या रुपात त्याच्यावर भरवसा दाखवण्यात आला तर तो MS धोनीसह, सुरेश रैना अन् शिखर धवन या तीन दिगज्जांना मागे टाकण्याचा डाव अगदी सहज साध्य करू शकतो. इथं एक नजर टाकुयात आशिया कप टी-२० स्पर्धेत संजूला खुणावणाऱ्या खास विक्रमावर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

खास विक्रमाला गवसणी घालण्यासाठी सर्वात आधी संधी मिळायला हवी, मग..

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघात ३ सलामीवीरांच्या रुपात संजूला संघात स्थान मिळाले आहे. टी-२० तील नंबर वन बॅटर अभिषेक शर्मासोबत तो याआधी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसलाय. पण शुबमन गिलच्या कमबॅकमुळे संजूचं स्थान धोक्यात आहे. जर त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायची असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळावे लागले. ही संधी जर सलामीवीराच्या रुपात मिळाली तर दोन तीन सामन्यातच तो मोठा डाव साधू शकतो. याउलट लोअर मिडल ऑर्डर बॅटरच्या रुपात तो खेळला तरी डाव साध्य होऊ शकतो. पण खालच्या क्रमांकावर खेळताना त्याचा रेकॉर्ड फारसा बरा नाही. 

Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

उत्तुंग फटकेबाजीसह  षटकार किंगच्या यादीतील रँकिंग सुधारण्याची संधी

संजू सॅमसन याने आतापर्यंतच्या आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ४२ सामन्यातील ३८ डावात ४९ षटकार मारले आहेत. आणखी एक मोठा फटका मारला तर षटकारांचे अर्धशतक साजरे करणारा तो १० वा भारतीय फलंदाज ठरेल. एका षटकारासह माजी सलामीवीर शिखर धनवची तो बरोबरी साधेल. धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत ५० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय महेंद्र सिंह धोनी (५२) आणि सुरेश रैना (५८) यांना मागे टाकण्याचा डावही तो सहज साध्य करू शकतो. धोनीला मागे टाकण्यासाठी त्याला ४ तर रैनालाच्या पुढे जाण्यासाठी १० षटकार मारावे लागतील.


T20I मध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • रोहित शर्मा - २०५
  • सूर्यकुमार यादव- १४६
  • विराट कोहली - १२४
  • केएल राहुल - ९९
  • हार्दिक पांड्या- ९५
  • युवराज सिंग - ७४
  • सुरेन रैना - ५८
  • एमएस धोनी - ५२
  • शिखर धवन - ५०
  • संजू सॅमसन -४९

Web Title: Sanju Samson Chance To Surpass MS Dhoni Suresh Raina Shikhar Dhawan Most Sixes For India In T20I Asia Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.