Join us

आयला छोटा सचिन; फोटो पाहून मास्टर ब्लास्टर म्हणतो...

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांची मनं जिंकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 19:47 IST

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहे. सचिनच्या चाहत्यांपैकी असणारा एक लहान चिमुकल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आनंद मेहता या नावाच्या युजर्सने त्यांच्या भाच्याचा फोटो शेअर केला होता. या चिमुकल्याचे नाव श्रेष्ठ मेहता असून क्रिकेटच्या मैदानात बसलेल्या या चिमुकल्यानं सचिनची १० नंबरची जर्सी परिधान केली आहे. आनंद मेहताने हा फोटो शेअर करुन तुम्ही जरी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आमच्या हृदयात तुमचं स्थान कायम राहणार असा खास संदेशही सचिनसाठी लिहिला होता. सचिनसारखा हुबेहुब श्रेष्ठ दिसत असल्याने हा फोटो सोशल मीडियावर चांगलीच मनं जिंकत होता. 

सचिनपर्यत या चिमुकल्याचा फोटो पोहचल्यानंतर त्याने देखील ट्विट करत हा फोटो शेअर केल्याबद्दल आनंदचे आभार मानले. तसेच दहा महिन्याच्या या चिमुकल्याला पुढील भविष्यासाठी सचिनने शुभेच्छा देखील दिल्या. सचिने शुभेच्छा दिल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांची मनं सचिनने जिंकली आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतट्विटरसोशल मीडियासोशल व्हायरल