ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

पहिल्यांदाच ही पुणेकर अन् मुंबईकर जोडी एकाच संघाकडून उतरलीये मैदानात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:41 IST2025-08-19T12:38:08+5:302025-08-19T12:41:45+5:30

whatsapp join usJoin us
Ruturaj Gaikwad Impresses With Ball In Buchi Babu Trophy And Picks Up A Wicket After Batter Hit Six Watch Video Here | ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ruturaj Gaikwad Impresses With Ball In Buchi Babu Trophy : आशिया कप स्पर्धेआधी बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेसह देशांतर्गत क्रिकेटलाही सुरुवात झालीये. चेन्नईच्या मैदानात १८ ऑगस्टपासून सुरु झालेल्या स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड हे दोन संघ आमने सामने आहेत. महाराष्ट्र संघाकडून मैदानात उतरलेल्या ऋतुराज गायकवाडनं या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजीतील आपली धमक दाखवून दिली. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्यांदाच ही पुणेकर अन् मुंबईकर जोडी एकाच संघाकडून उतरलीये मैदानात 

ऋतुराज गायकवाड हा  भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. बुची बाबू स्पर्धेत तो महाराष्ट्र संघाच्या ताफ्यातून गोलंदाजीत हात आजमावताना दिसून आले. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच पुणेकर ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर पृथ्वी शॉ ही जोडी एका संघातून मैदानात उतरली आहे. एका बाजूला ऋतुराजनं गोलंदाजीनं तर पृथ्वीनं तीन झेल घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले.

सिक्सर मारला, मग ऋतुराजनं दुसऱ्याच चेंडूवर घेतली विकेट

पहिल्या दिवसाच्या अखेरीस महाराष्ट्र संघाचा कर्णधार अंकित बावने याने चेंडू ऋतुराज गायकवाडच्या हाती सोपवला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सौरभ मजूमदार याने ऋतुराजला पुढे येऊन उत्तुंग षटकार मारला. पुन्हा दुसऱ्या चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण ऋतुराज गायकवाड याने आपल्याच गोलंदाजीवर सुरेख झेल पकडत त्याचा खेळ खल्लास केला. या विकेटसह छत्तीसगडचा पहिला डाव ८९.३ षटकात २५२ धावांवर आटोपला. चेन्नईच्या मैदानात अखेरच्या षटकात बॉलिंगमध्ये धमक दाखवल्यावर आता बॅटिंगमध्ये तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याडजोगे असेल. त्याच्याशिवाय पृथ्वीच्या खेळीवरही सर्वांच्या नजरा असतील.

Web Title: Ruturaj Gaikwad Impresses With Ball In Buchi Babu Trophy And Picks Up A Wicket After Batter Hit Six Watch Video Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.