Join us

रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी

ऑस्ट्रेलियन संसदेतील भाषणात काय म्हणाला रोहित शर्मा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:36 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत 'बोलंदाजी' केल्याचा खास क्षण पाहायला मिळाला. प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध सराव सामन्याआधी भारतीय संघाचा कॅप्टन आणि संघातील खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतल्याची गोष्ट चर्चेत असताना आता त्यात रोहितच्या ऑस्ट्रेलियातील संसदेतील भाषणाची भर पडली आहे. 

टीम इंडियातील खेळाडूंच्या स्वागताचा सोहळा

कॅनबेराच्या संसदेत भाषण करताना रोहित शर्मानं भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांतील संबंध आणि आगामी बॉर्डर गावसकर स्पर्धेसंदर्भात भाष्य केले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी कॅनबेरा येथील सराव सामन्याआधी  संसदेत भारतीय संघातील खेळाडूंच्या स्वागताचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. यादरम्यान रोहित शर्मा संसदेत भाषण करताना पाहायला मिळाले.  

 रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियन संसदेत केलं भाषण

 ऑस्ट्रेलियन संसदेतील भाषण करताना रोहित म्हणाला की, खेळ असो किंवा व्यापार भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही देशातील संबंध खूपच चांगले आहेत. फार वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. मागील अनेक वर्षांपासून आम्ही ऑस्ट्रेलियात येऊन खेळत आहोत. इथं खेळणं नेहमीच आव्हानात्मक असते. कारण इथं क्रिकेटचा सर्वोच्च आनंद घेणारे लोक आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्समधील स्पर्धात्मक भावना आहे, असे  तो म्हणाला.  आम्ही मागच्या आठवड्यात जे यश मिळवलं ते कायम टिकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरु. क्रिकेटच्या मैदानातून भारतीयांसह ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आनंद द्विगुणीत करु, असेही रोहित म्हणाला आहे.

पिंक बॉल टेस्टआधी प्रॅक्टिस मॅच

भारतीय संघ गुरुवारी पर्थ हून कॅनबेराला पोहचला आहे. शनिवारी मनुका ओव्हलच्या मैदानात टीम इंडिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना दोन दिवसीय असेल. त्यानंतर भारतीय संघ ६ डिसेंबरला  अ‍ॅडलेड कसोटीसाठी मैदानात उतरेल. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माआॅस्ट्रेलिया